आष्टा : येथील नामांकित 'शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आष्टा' या संस्थेला विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर विभाग यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र वाढीस अधिकृत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता संस्थेला सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही आपल्या शाखांचा विस्तार करण्याची आणि व्यवसाय वृद्धीची मोठी संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅड. श्री. अभिजीत अशोक वग्याणी यांनी दिली.
संस्थेला कोल्हापूर जिल्ह्यात कार्यक्षेत्र वाढीची मंजुरी मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून संस्थेचे चेअरमन अॅड. अभिजीत वग्याणी आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
शिवशक्ती पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात आपली पकड मजबूत ठेवत चमकदार कामगिरी केली आहे. संस्थेची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
भाग भांडवल: १ कोटी ५७ लाख ८० हजार रुपये
राखीव निधी: २ कोटी ६४ लाख ९ हजार रुपये
ठेवी: ३५ कोटी ७१ लाख ६ हजार रुपये
कर्जवाटप: २८ कोटी ८२ लाख ४५ हजार रुपये
गुंतवणूक: १३ कोटी ८ लाख ९० हजार रुपये
नफा: ४७ लाख १४ हजार ८३१ रुपये (३१ मार्च २०२६ अखेर)
ऑडिट वर्ग: 'अ' वर्ग
लाभांश (डिव्हिडंड): सभासदांसाठी १२% जाहीर
एन.पी.ए. (NPA): ०% (शून्य टक्के एनपीए असणारी संस्था)
व्याजदर नीति: कर्जावर सरळ व्याज घेणारी एकमेव संस्था
तंत्रज्ञान व सुविधा: पूर्णपणे 'कोअर बँकिंग सिस्टीम'वर आधारित कामकाज
इतर सुविधा: RTGS/NEFT सुविधा, SMS अलर्ट, लॉकर सुविधा, आणि वीज बिल भरणा सुविधा उपलब्ध
स्वतःची इमारत: सुसज्ज व स्वतःच्या मालकीची इमारत
ग्राहक सेवा: ठेवीदारांना तत्पर व विनम्र सेवा
संस्थेच्या यशस्वी घौडदौडीचा भाग म्हणून लवकरच समडोळी येथे संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
संस्थेचे संस्थापक स्व. रावळाप्पा मल्लु कुंभार आणि मुख्य प्रवर्तक स्व. अशोकराव चंद्रकांत वग्याणी यांच्या प्रेरणेने संस्थेची प्रगती सुरू आहे. यावेळी व्हा. चेअरमन श्री. कृष्णराव रावळाप्पा कुंभार, सचिव श्री. सुरेश श्रीपाल कुंभार, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद व सेवक वर्ग यांनी संस्थेच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.