सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, राज्यमंत्री मा. शेखर चरेगावकर व उपस्थित मान्यवर  
Co-op Credit Societies

सरस्वती ग्रामीण सहकारी पतसंस्था रेवराळची वार्षिक सभा संपन्न

ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन, सभासदांची कार्यशाळा उत्साहात

Pratap Patil

मौदा तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली सरस्वती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था रेवराळची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासदांची कार्यशाळा आणि ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम सामुदाईक भवन धामणगाव येथे नुकताच हजारो सभासद, ग्राहकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपस्थित सर्व सभासदांनी सर्वसाधारण सभेच्या १५ विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, राज्यमंत्री मा. शेखर चरेगावकर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून ग्राहकांनी संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आणि सभासदांना प्रशिक्षण देण्यात आले. व्यवस्थापक लक्ष्मण मदनकर यांनी सांगितले की, संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. संस्था ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने NEFT, RTGS द्वारे उत्तम सेवा देत आहे. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कार्याचे आणि उपक्रमांचे कौतुक केले.

सरस्वती ग्रामीण सहकारी पतसंस्थाचे उपस्थित मान्यवर व सभासद

यावेळी मृत सभासदाच्या वारसाला ५,००० रुपयांचा चेक देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, नियमित व्यवहार करणारे सभासद, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण दहावी व बारावी विद्यार्थी, नुकतेच MBBS पास झालेले जोगेश बारई, १०२ वेळा रक्तदान करणारे श्री. दाते यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मार्गदर्शक नागेश्वर मदनकर, ॲड. लक्ष्मीकांत सुपारे, धामणगाव येथील सरपंच अक्षय पंचबुढे, सभापती स्वप्नील श्रावणकर, चिंतामण मदनकर, संस्थेचे अध्यक्ष अशोक मदनकर, समस्त संचालक मंडळ, कर्मचारी, विकास अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने मौदा तालुक्यातील सभासद उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT