नोकरीची संधी! प्रगती पतसंस्थेत व्यवस्थापक, लिपिक व पिग्मी एजंट पदांची भरती; 'या' तारखेला होणार मुलाखत 
Co-op Credit Societies

धाराशिव: प्रगती सहकारी पतसंस्थेत विविध पदांसाठी बंपर भरती

१० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत; १२ ऑक्टोबरला थेट मुलाखतीचे आयोजन.

Prachi Tadakhe

धाराशिव: जिल्ह्यातील अग्रणी वित्तीय संस्था असलेल्या 'प्रगती सहकारी पतसंस्था मर्यादित, धाराशिव' यांच्या वतीने विविध शाखांमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, कळंब आणि परंडा या शाखांमध्ये ही पदभरती तातडीने केली जाणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा उपलब्ध

पतसंस्थेने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार खालील पदांसाठी भरती होणार आहे:

1. उपशाखा व्यवस्थापक: तुळजापूर शाखा (१ पद) आणि कळंब शाखा (१ पद).

शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT, (मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक)

2. क्लर्क कम कॅशियर: तुळजापूर शाखा (२ पदे) आणि कळंब शाखा (२ पदे)

शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT, (मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक)

3. पिग्मी एजंट: तुळजापूर (५ पदे), उमरगा (५ पदे), लोहारा (५ पदे), भूम (५ पदे), कळंब (५ पदे) आणि परंडा (५ पदे) या शाखांसाठी मिळून एकूण ३० पिग्मी एजंटची पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक अर्हता: १० किंवा १२ वी पास

अर्ज कसा करावा आणि मुलाखतीची तारीख

इच्छुक उमेदवारांनी आपला अपडेटेड बायोडाटा (Biodata), पासपोर्ट साईज फोटो आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज PRAGATIHEADOFFICE@GMAIL.COM या ईमेल आयडीवर पाठवता येतील.

प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

  • मुलाखतीची तारीख: १२ ऑक्टोबर २०२६

  • मुलाखतीचे ठिकाण: हॉल नं. ३ व ४, छत्रपती संभाजी महाराज कॉम्प्लेक्स, संत गाडगे बाबा चौक, शहर पोलीस स्टेशन जवळ, धाराशिव - ४१३५०१

  • संपर्क क्रमांक: ९८२२७२२२४८ / ९५२७२९५६९५

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाईल, अशी माहिती पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT