अध्यक्ष संजय नागरे व उपस्थित मान्यवर  
Co-op Credit Societies

मविप्र सेवक सोसायटी नाशिकची वार्षिक सभा उत्साहात

६.२५ टक्के लाभांश मंजूर, सभासद पाल्यांचा गुणगौरव

Pratap Patil

नाशिक: पगारदार सहकारी पतसंस्थांमध्ये अग्रेसर असलेली नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटी लि. नाशिकची ६३ वी सर्वसाधारण सभा नुकतीच कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र सेवक सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. आर्थिक वर्षासाठी ६.२५ टक्के लाभांशाची शिफारस सभागृहाने मंजूर केली. यावर्षी सेवक सोसायटीला ४ कोटी ८७ लाख ३६ हजार ६५९ इतका विक्रमी नफा झाल्याचे अध्यक्ष नागरे यांनी सांगितले.

सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने प्रारंभी सभासद, सभासद पाल्य यांचा गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मविप्रचे सरचिटणीस व मविप्र सेवक सोसायटीचे पदसिद्ध सदस्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक रमेश पिंगळे, ॲड. लक्ष्मण लाडंगे, विजय पगार, शिवाजी गडाख, सेवक संचालक डॉ. संजय शिंदे, चंद्रजित शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, नितीन जाधव, डॉ. विलास देशमुख, डॉ. के. एस. शिंदे, अजित मोरे, शशिकांत मोगल प्रमुख उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेत सर्वप्रथम दिवंगत माजी पदाधिकारी, सेवक सोसायटीचे सभासद, सेवानिवृत्त ज्ञात-अज्ञात या सर्वांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. अध्यक्ष संजय नागरे यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी शिस्तीचा व आधुनिक बदलांचा अहवाल सभागृहासमोर मांडला.

सभेने घेतलेले निर्णय:

यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये वीजबिल बचतीसाठी सेवक सोसायटीत सोलर बसविले, ऑनलाइन सर्व्हरही बसविले, आयडीबीआय बँकेकडून स्क्रीनसह प्रोजेक्टर मिळविले, बँक ऑफ महाराष्ट्राकडून प्रिंटर मिळविले. एसबीआय बँकेमार्फत वॉटर फ्युरिफायर मिळविले, दरमहा सोसायटीकडून शाखेला पाठविण्यात येणाऱ्या कपात तक्त्यात बदल व सुधारणा केल्या. थकीत कर्जदारांकडून वसुलीसाठी कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती करून कायदेशीर कार्यवाही सुरु केली, सभासद कल्याणनिधीची वार्षिक वर्गणी ८०० रुपये ऐवजी ५०० करणे, मयत सभासदांना २ लाखांवरून २.५ लाख मदत देण्याचा निर्णय एकमताने झाला.

सभासद साहाय्यनिधी, सभासद कल्याणनिधी, सभासद परिवार सद्भावना आदी कल्याणकारी योजनांचा आढावा घेऊन कार्यकारी मंडळाने दुरुस्ती सूचवून पुढील सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय झाला. सभासद पाल्य गुणगौरव व बक्षीस नियमावलीत एमपीएससी, युपीएससी परीक्षा उत्तीर्ण व नियुक्ती झालेल्या सभासद पाल्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. शिष्यवृत्ती व क्रीडा योजनेत सैनिकी शाळा प्रावीण्य मिळवलेल्या सभासद पाल्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी राखीव निधी १० टक्के कपात करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

यावेळी शरद निकम, संजय पगार, रमाकांत भामरे, शंकर सांगळे, शरद बोरस्ते, लहू कोर, सचिन शेवाळे, गंगाधर कोरडे, संजय महाले आदी सभासदांनी सूचना मांडल्या. यावेळी मानद चिटणीस विनित पवार यांनी इत्तिवृत्ताचे वाचन केले. सर्वसाधारण सभेला संचालक सुनील अहिर, सुनील काळे, मंगेश ठाकरे, ज्ञानेश्वर जाधव, डॉ. संजय शिंदे, मनिष बोरसे, कृष्णराव मोरे, अनिल भंडारे, शांताराम चांदोरी, दत्तराज हयाळीज, किरण उघडे, सुवर्णा कोकाटे, वैशाली कोकाटे, तज्ज्ञ संचालक दत्तू पडोळ आदींसह सभासद उपस्थित होते. अशोक गावले यांनी सूत्रसंचालन केले. सेवक सोसायटीचे उपाध्यक्ष नंदकुमार घोटेकर यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT