बांबवडे: कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीने सरत्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला २ कोटी रुपयांहून अधिक नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अजय लोध यांनी दिली आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च अखेरपर्यंतच्या आर्थिक आकडेवारीतून संस्थेची मजबूत स्थिती स्पष्ट होत आहे:
एकूण नफा: ३१ मार्च अखेर संस्थेचा ढोबळ नफा २.०१ कोटी रुपये इतका झाला आहे.
ठेवी: संस्थेकडे सध्या १६७.८३ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत.
भागभांडवल: संस्थेचे भागभांडवल २.२६ कोटी रुपये आहे.
गुंतवणूक आणि कर्ज: संस्थेची वार्षिक गुंतवणूक ५७.३० कोटी असून, १२३.३७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
एकूण व्यवसाय: संस्थेने या वर्षात ३०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे.
या यशाबद्दल माहिती देताना संस्थापक अध्यक्ष अजय लोध यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने व्हा. चेअरमन गिरीश बाष्टे, जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी, आणि संचालक बाळकृष्ण गद्रे, गुलाब गफुर भटारी, अमोल केसरकर, अतुल भिंगार्डे, सर्जेराव पाटील, सागर पाटील, राजेंद्र कोठावळे, संजय भोपळे, भीमराव सनगर, रजिता वारंगे, राजश्री मगर, रवींद्र पाथरे, प्रसाद वळीवडेकर, नंदकुमार कोठावळे आणि संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शाहूवाडी तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून मलकापूर अर्बन क्रेडिट सोसायटीने कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात आपला विश्वासार्ह ठसा उमटवला आहे. ३०० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केल्यामुळे सभासद आणि ठेवीदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.