श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,  
Co-op Credit Societies

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवींचा आकडा १५ कोटींच्या पार

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३६ लाख २६ हजार ८०६ रुपयांचा निव्वळ नफा

Prachi Tadakhe

मुरूम (ता. उमरगा): येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ३६ लाख २६ हजार ८०६ रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. संस्थेच्या या यशाबद्दल सभासद आणि सहकार क्षेत्रातून कौतुक होत आहे.

सोमवार, ६ एप्रिल रोजी संस्थेच्या 'बसव सहकार भवन' या इमारतीत पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरणाळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ३१ मार्च २०२६ अखेरच्या तेरीज पत्रक, नफा-तोटा आणि ताळेबंदावर सविस्तर चर्चा करून त्यास मंजुरी देण्यात आली.

आर्थिक स्थितीवर एक नजर (३१ मार्च २०२६ अखेर):

संस्थेचे हे १६ वे वर्ष असून, वर्षभरात सर्वच क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे:

  • निव्वळ नफा: ₹३६,२६,८०६

  • एकूण ठेवी: ₹१५ कोटी ९३ लाख ६५ हजार ६४७

  • कर्ज वाटप: ₹१२ कोटी ८३ लाख ६१ हजार ९५५

  • इतर बँक गुंतवणूक: ₹६ कोटी २२ लाख ६१ हजार ८०८

  • खेळते भांडवल: ₹२१ कोटी ३३ लाख ४ हजार ७५७

  • एकूण सभासद संख्या: ४,२९४

पारदर्शक कारभार आणि तांत्रिक प्रगती

संस्थेच्या स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग 'अ' दर्जा प्राप्त असून संस्था संपूर्ण संगणकीकृत आहे. शासकीय धोरणानुसार कॅशलेस व्यवहारांवर भर देण्यात येत असून, मागील सात वर्षांपासून RTGS / NEFT आणि आता मोबाईल बँकिंगची सुविधाही सभासदांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवहाराचा संदेश (SMS) त्वरित सभासदांना प्राप्त होतो, ज्यामुळे पारदर्शकता टिकून आहे.

विविध योजना आणि सुविधा

संस्थेमार्फत महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वामी विवेकानंद ठेव योजना यांसारख्या अनेक आकर्षक ठेव योजना राबविल्या जातात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी स्वतंत्र लॉकर सुविधा, १०% दराने सोने तारण कर्ज आणि महावितरण वीज बिल भरणा केंद्र देखील कार्यान्वित आहे.

या बैठकीला पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, अमृत वरनाळे, मनिष मुदकण्णा, श्रीशैल बिराजदार, बाबासाहेब पाटील, मनोज बोंदर, इंद्रजित लोखंडे, सौ. संगीता जाधव, सौ. वंदना सोनवणे, शिवराज समन, अनंत हिरमुखे, शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टे सचिन कंटेकूरे, सौ. नेहा शेवाळकर, पिग्मी एजन्ट संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, राजेंद्र मुदकण्णा, गुंडेराव गुरव आणि कर्मचारी उपस्थित होते.

येत्या १२ मे रोजी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन शिवशरण वरणाळे यांनी यावेळी दिली.

SCROLL FOR NEXT