महिलांच्या जिद्दीतून उभी राहिली बेलापूरची आर्थिक शक्ती. 
Co-op Credit Societies

बेलापूरच्या श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रगतीचा चढता आलेख

महिला संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि १००% वसुलीवर भर.

Prachi Tadakhe

बेलापूर : महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या संस्था कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने घालून दिले आहे. गेल्या आठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत संस्थेने पारदर्शक, सर्वसमावेशक आणि शिस्तबद्ध कामकाजाचा नवा मापदंड तयार केला असून, ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे.

आर्थिक स्थितीवर एक नजर (३१ मार्च २०२६ अखेर)

संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात आपल्या ठेवी, कर्ज आणि नफ्यामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. मुख्य आर्थिक आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • एकूण ठेवी: ₹९ कोटी ४१ लाख ८३ हजार १०२

  • कर्ज वाटप: ₹७ कोटी २४ लाख ५० हजार ९६४

  • गुंतवणूक: ₹२ कोटी ९७ लाख ८८ हजार ९७८

  • राखीव निधी: ₹४८ लाख ९० हजार ४७२

  • भागभांडवल: ₹१३ लाख ७ हजार ६८१

  • निव्वळ नफा: ₹१७ लाख ३३ हजार २६९

  • सी.डी. रेशो: ६६.६७%

१००% महिला व्यवस्थापन आणि वसुलीवर भर

संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळ हे महिलांचे आहे. "वितरणातच वसुली दडलेली असते" हे सूत्र अमलात आणत संस्थेने अत्यंत शिस्तबद्ध कर्ज वाटप केले आहे. महिलांच्या कार्यक्षम नियोजनामुळे संस्थेची वसुली यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरली असून, त्यामुळेच संस्था सातत्याने नफ्यात आहे.

ठेवीदारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

संस्थेच्या विश्वासार्हतेचे मुख्य कारण म्हणजे ठेवीदारांना दिलेले सुरक्षा कवच. 'लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडा' अंतर्गत संस्थेतील ९९% ठेवीदारांच्या सर्व ठेवी अत्यंत सुरक्षित आहेत. यामुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये संस्थेबद्दल मोठी विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

नेतृत्वाचा मोलाचा वाटा

संस्थेच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये अध्यक्षा सौ. विद्या वासुदेव काळे आणि उपाध्यक्षा सौ. अमितकौर मनजीत सिंग बतरा यांच्यासह सर्व संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वृंदाचे मोलाचे योगदान लाभले आहे. बेलापूर परिसरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही संस्था आता एक आधारस्तंभ ठरत आहे.

SCROLL FOR NEXT