लोकमान्य निबंध स्पर्धेचे आयोजन २३ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत लोकमान्य मल्टिपर्पज को ऑ प. सोसायटी
Co-op Credit Societies

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे आंतरशालेय निबंध स्पर्धा

अंतिम निकाल जाहीर करताना शाखेनिहाय तीन विजेते घोषित केले जातील.

Reva Kulkarni

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आंतरशालेय लोकमान्य निबंध स्पर्धेचे आयोजन २३ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांच्या कार्याने प्रेरित होऊन मुलांच्या वैचारिक कल्पकतेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही निबंध स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी होणार आहे. निबंधासाठी किमान शब्दसंख्या ८०० ते तर कमाल १००० आहे. निबंधामध्ये घोषवाक्य, चारोळ्या तसेच अलंकारिक भाषेचा वापर करावा.ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रवेश अर्जावर शाळेचा शिक्का आणि मुख्याध्यापक सहीसहित प्रवेश अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. अंतिम निकाल जाहीर करताना शाखेनिहाय तीन विजेते घोषित केले जातील.

विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रशस्तीपत्रे देण्यात येतील, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले निबंध १ ऑगस्टपर्यंत आपल्या जवळच्या शाखेत जमा करावेत. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असल्याने जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमान्य सोसायटी रत्नागिरी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

प्रधान कार्यालय, पूणे, महाराष्ट्र

स्पर्धेचे विषय

१) लोकमान्य टिळकांचे राष्ट्रकार्य आणि त्यांचे योगदान

२) लोकमान्य टिळक आधुनिक भारताचे प्रणेते

३) गणेशोत्सव आणि शिवजयंती टिळकांची सामाजिक क्रांती

४) लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास

५) स्वाभिमान मराठी भाषेचा

SCROLL FOR NEXT