कान्हूर पठार पतसंस्था 
Co-op Credit Societies

कान्हूर पठार पतसंस्थेचा दमदार आर्थिक परफॉर्मन्स; ११.६२ कोटींचा ढोबळ नफा

व्यवहारवाढ, डिजिटल सेवांचा विस्तार आणि मजबूत व्यवस्थापनामुळे संस्थेची झपाट्याने प्रगती

Vijay chavan

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील मुख्य कार्यालय असलेल्या कान्हूर पठार पतसंस्थेने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ११ कोटी ६२ लाख रुपयांचा ढोबळ नफा नोंदवला आहे. सर्व तरतुदी वजा केल्यानंतर संस्थेचा निव्वळ नफा सुमारे ३ कोटी १० लाख रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुशीला ठुबे व कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी दिली.

संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपाध्यक्ष पी. के. ठुबे , संचालक मंडळातील सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे २,००० कोटी रुपये इतकी झाली असून, भागभांडवल ५७७ कोटी रुपये आहे. संस्थेच्या १३ शाखा कार्यरत असून सर्व शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संस्थेने स्वतःचे डेटा सेंटर सुरू केले असून, लवकरच यूपीआय आणि कोअर बँकिंगद्वारे अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू आहे.

पतसंस्थेने आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. वाढत्या व्यवहारांमुळे संस्थेने आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम, ऑनलाइन व्यवहार आणि वीजबिल भरणा अशा आधुनिक सुविधा सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

उच्चशिक्षित, कर्तव्यदक्ष आणि तत्पर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे संस्थेने राज्य पातळीवर आपले स्थान मजबूत केले आहे. सातत्यपूर्ण प्रगतीमुळे संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला असून, व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ, इन्क्रिमेंट, विमा व बोनस यांसारखे निर्णय घेतले आहेत.

संस्थेची ही प्रगती सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागातील आर्थिक बळकटीसाठी अशा पतसंस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे.

SCROLL FOR NEXT