कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.प्रकाश आबिटकर,व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री.काका कोयटे, शंकर पाटील,पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष,अनिल पाटील, व उपस्थितीत मान्यवर  
Co-op Credit Societies

कल्पद्रुम ग्रामीण पतसंस्था हसूर ठरली आदर्श पतसंस्था!

पालकमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान

Pratap Patil

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन कोल्हापूर यांच्याकडून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हसूर या संस्थेचा २०२५ साठी ५ ते ५० कोटी ठेवी गटामध्ये "आदर्श पतसंस्था पुरस्कार"ने नुकताच गौरव करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर, व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काका कोयटे, शंकर पाटील, जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, अनिल पाटील, फेडरेशनचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हसूर संस्थेचे चेअरमन श्री. नेमगोंडा पाटील तसेच संस्थेचे संचालक श्री. मलगोंडा पाटील, श्री.महावीर पाटील, श्री.अमोल कुमटाळे, श्री.अभय पाटील, श्री.सुहाग कोळी, श्री.नेमगोडा पाटील, श्री शांतिनाथ पाटील तसेच संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

SCROLL FOR NEXT