ब्रेकिंग न्यूज: 'जन सहकार' नागरी सहकारी पतसंस्थेत मेगा भरती जाहीर! 
Co-op Credit Societies

जन सहकार नागरी सहकारी पतसंस्थेत नोकरीची सुवर्णसंधी!

कराड, तळमावले, आगाशिवनगर आणि कोपरखैरणे शाखांसाठी होणार भरती.

Prachi Tadakhe

कराड: रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'जन सहकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित' या नामांकित संस्थेने आपल्या विविध शाखांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या ४ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'जन सहकार' पतसंस्थेचा विस्तार होत असून, सर्व शाखांचे कामकाज अधिक सक्षमपणे चालवण्यासाठी ही कर्मचारी भरती केली जात आहे. यामध्ये क्लर्कपासून ते शिपाई पदापर्यंतच्या जागांचा समावेश आहे.

रिक्त पदांचा तपशील आणि आवश्यक पात्रता :

  • १. क्लर्क (Clerk):

    पात्रता: उमेदवार पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

  • २. मार्केटिंग ऑफिसर (Marketing Officer):

    पात्रता: या पदासाठी देखील पदवीधर उमेदवार आवश्यक असून, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य मिळेल.

  • ३. पिग्मी एजंट (Pigmy Agent):

    पात्रता: दैनंदिन ठेव संकलन करणाऱ्या या पदासाठी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

  • ४. शिपाई (Peon):

    पात्रता: या पदासाठी उमेदवार किमान १२ वी पास असणे बंधनकारक आहे.

'या' शाखांसाठी होणार भरती

'जन सहकार' पतसंस्थेच्या खालील प्रमुख शाखांमधील रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे:

  • तळमावले

  • कराड

  • आगाशिवनगर

  • कोपरखैरणे

असा करा अर्ज (How to Apply):

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडाटा (Resume) संस्थेच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. तसेच, उमेदवारांनी आपला रिझ्युम सोबत घेऊन संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष (समक्ष) भेट देणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट: www.jansahakar.com

ई-मेल आयडी: office@jansahakar.com

संपर्क क्रमांक: +91 7774877009

सहकार क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी या संधीचा सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

SCROLL FOR NEXT