पाथर्डी : कोअर बँकिंग प्रणाली, मोबाईल बँकिंग, यूपीआय-क्यूआर कोड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यरत असलेल्या 'गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. गेवराई'च्या पाथर्डी (जि. अहिल्यानगर) शाखेसाठी विविध पदांवर भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुकांसाठी येत्या शनिवारी, १२ सप्टेंबर २०२६ रोजी थेट मुलाखतींचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले आहे.
भरती केली जाणारी पदे आणि शैक्षणिक पात्रता:
शाखाधिकारी: पदवीधर, कोअर बँकिंग सॉफ्टवेअर व संगणकाचे ज्ञान आवश्यक. बँक/पतसंस्थेतील ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे.
एच.आर. मॅनेजर: एम.बी.ए. (एच.आर.). बँक/पतसंस्थेतील ३ ते ५ वर्षांचा अनुभव.
वसुली अधिकारी: पदवीधर, कोअर बँकिंग सॉफ्टवेअर व संगणकीय ज्ञान. बँक/पतसंस्थेतील वसुली विभागाचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य.
सिनिअर ऑफिसर: पदवीधर, कोअर बँकिंग सॉफ्टवेअर व संगणकीय ज्ञान. बँक/पतसंस्थेतील ३ ते ५ वर्षांचा अनुभव.
मार्केटिंग ऑफिसर: पदवीधर, कोअर बँकिंग सॉफ्टवेअर व संगणक ज्ञान. बँक/पतसंस्थेतील ३ ते ५ वर्षांचा अनुभव.
क्लार्क कम कॅशिअर: पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक. बँक/पतसंस्थेतील अनुभवास प्राधान्य.
पिग्मी एजंट: १० वी / १२ वी उत्तीर्ण.
शिपाई: १० वी / १२ वी उत्तीर्ण.
(नोंद: अनुभवी व पात्र उमेदवारांना अपेक्षित वेतन दिले जाईल.)
मुलाखतीची वेळ व ठिकाण:
दिनांक: शनिवार, १२ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ११.०० वाजता
ठिकाण: शेवगाव रोड, नवीन बसस्टँड शेजारी, गर्जे कॉम्प्लेक्स, पाथर्डी, जि. अहिल्यानगर.
अधिक माहितीसाठी संपर्क: ९४०३४१६१८१ / ९३०९१७८४५६ / ७०८३७११५६८