कोल्हापूर : येथील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ व्या शाखेचा शुभारंभ विभागीय सहनिबंधक महेश कदम यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी अध्यक्ष किरण पाटोळे यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री.कदम म्हणाले की, "३६ वर्षांपूर्वी भिशी गटातून सुरू झालेल्या श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेने आज ८५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. या संस्थेने सभासदांमध्ये आपुलकी निर्माण केलेली आहे. सभासदांच्या विश्वासार्हतेच्या जोरावरच या पतसंस्थेने प्रगती साध्य केलेली असून आज पतसंस्थेच्या संभाजीनगर येथील पाचव्या शाखेचा शुभारंभ होत आहे."
संस्थेचे अध्यक्ष किरण पाटोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले. तसेच शुभारंभ दिनी दोन कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचे अध्यक्ष पाटोळे यांनी सांगितले. कार्यक्रमास संस्थापक आर. बी. पाटोळे, उपाध्यक्ष प्रकाश पाटोळे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते. प्रा. सुनील भोसले यांनी आभार मानले.