फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., येथे विविध पदांसाठी थेट मुलाखत  विटा शाखेसाठी विविध पदांवर भरती करण्यात येत आहे.
Co-op Credit Societies

फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., येथे विविध पदांसाठी थेट मुलाखत

विटा शाखेसाठी विविध पदांवर भरती करण्यात येत आहे.

Reva Kulkarni

बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.सांगोला यांच्या विटा शाखेसाठी विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता थेट मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

भरावयाची पदे व आवश्यक पात्रता

या भरती प्रक्रियेमध्ये शाखाधिकारी, गोल्ड लोन ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, वसुली अधिकारी, क्लर्क आणि कॅशियर या पदांचा समावेश आहे.

शाखाधिकारी पदसंख्या १

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून किमान ५ वर्षांचा बँकिंग व फायनान्सचा अनुभव असावा.

गोल्ड लोन ऑफिसर पदसंख्या

पदवीसह ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

सेल्स एक्झिक्युटिव्ह पदसंख्या २

उमेदवार १२ वी उत्तीर्ण अथवा पदवीधर असावा आणि २ वर्षांचा फायनान्सचा अनुभव असावा.

वसुली अधिकारी पदसंख्या २

पदांसाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण अथवा पदवीधर असावा आणि २ वर्षांचा फायनान्सचा अनुभव असावा.

क्लर्क पदसंख्या १

पदांसाठी पदवी आवश्यक असून २ वर्षांचा अनुभव असावा.

कॅशियर पदसंख्या १

पदांसाठी पदवी आवश्यक असून २ वर्षांचा अनुभव असावा.

मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ:

मुलाखत सोमवार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता खालील ठिकाणी घेण्यात येणार आहे

शाखा:

तासगांव कृषी सेवा केंद्र,

शॉप नं. ०१, तासगांव-मणेराजुरी रोड,

दत्त माळ पाण्याच्या टाकीसमोर,

वासुंबे, ता. तासगांव, जि. सांगली.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

९८०१२४२७२७ / ९५२७८०२५६५ / ८८६२०००१४६

ईमेल: fabtechmulti@gmail.com

SCROLL FOR NEXT