फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये विविध पदांची भरती सुरु 
Co-op Credit Societies

फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अक्कलकोट शाखेत भरती; थेट मुलाखत!

अक्कलकोट शाखेकरिता पदवीधरांना संधी; इच्छुकांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहण्याचे आवाहन.

Prachi Tadakhe

सांगोला / अक्कलकोट : बँकिंग क्षेत्रात ४० शाखांसह अग्रेसर असणाऱ्या सांगोल्याच्या 'फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.' (मुख्य कार्यालय: लोखंडे हाईट्स, वाढेगाव नाका, सांगोला) यांच्यामार्फत नवीन रिक्त पदे भरण्यात येत आहेत. संस्थेच्या अक्कलकोट शाखेकरिता विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:

१. गोल्ड लोन ऑफिसर

  • पत्ता/जागा: ५ जागा

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर

  • अनुभव: संबंधित क्षेत्रात किमान २ ते ३ वर्षे अनुभव.

२. पिग्मी एजंट

  • जागा: २ जागा

  • शैक्षणिक पात्रता: १२ वी पास किंवा पदवीधर

  • अनुभव: किमान २ ते ३ वर्षे अनुभव.

३. सेल्स ऑफिसर

  • जागा: ३ जागा

  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर

  • अनुभव: किमान २ ते ३ वर्षे अनुभव.

थेट मुलाखतीची तारीख आणि वेळ:

वरील पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी शनिवार, दिनांक २४/१०/२०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता खालील पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुलाखतीचा व संपर्काचा पत्ता:

  • पत्ता: सावरकर चौक, सुभाष गल्ली, बिडवे कॉम्प्लेक्स, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर.

  • मोबाईल नंबर: ९९२३७५२४२५ / ९३०९००५६३४ / ९८०१२४२७२७.

  • ईमेल आयडी: fabtechmulti@gmail.com / fabtechakt27@gmail.com.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी ठरलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय कार्यालय, फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सांगोला यांच्याकडून करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT