संजय नागरे  संजय नागरे
Co-op Credit Societies

संजय नागरे यांची पतसंस्था उपविधी समितीवर निवड

महाराष्ट्रातून एकमेव अशासकीय सदस्य

Pratap Patil

नाशिक : सहकार अधिनियमातील बदललेल्या तरतुदींच्या अनुषंगाने पगारदार सहकारी पतसंस्थांचे आदर्श उपविधी सन २०१३ मध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार पतसंस्था आदर्श उपविधी दुरुस्तीसाठी नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून श्री. संजय नागरे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. श्री.संजय नागरे हे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी संजय नागरे यांना निवडीचे पत्र दिले आहे.

समितीच्या अध्यक्षपदी अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर (पुणे) यांची निवड करण्यात आलेली आहे. समितीतील इतर सदस्य याप्रमाणेः निवृत्त अपर आयुक्त शैलेश कोथमिरे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) राम शिर्के, सहकारतज्ज्ञ गणेश निमकर, रत्नागिरीचे सोपान शिंदे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, जिजाबा पवार, पुणे येथील उपनिबंधक मिलिंद सोबले.

SCROLL FOR NEXT