महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विस्तार करत अल्पावधीतच ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन करणाऱ्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट, लातूर या पतसंस्थेला पतसंस्थांसाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘दिपस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा भोर (जि. पुणे) येथे उत्साहात पार पडला.
सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे प्रदान करण्यात येतो. यावेळी मा. उदय जोशी, फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमती सुरेखा लवांडे CEO पतसंस्था फेडरेशन,तसेच पतसंस्था फेडरेशनचे संचालक श्रीमान बांगर, वासुदेव काळे,रवींद्र भोसले उपस्थित होते
पुरस्कार स्वीकृत करताना छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्था लातूरचे संचालक विजयकुमार शेळके, संचालक श्री. अमर सोट व श्री. मोहन जाधव उपस्थित होते.
संस्थेच्या संचालक मंडळातील बहुतांश सदस्य बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने संस्थेने ग्राहकांचे हित, पारदर्शक कार्यपद्धती, कडक आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख सेवा यांना प्राधान्य दिले आहे. केंद्रीय सहकार खात्याच्या सर्व नियमांची काटेकोर पूर्तता करत संस्थेने आदर्श कार्यप्रणाली निर्माण केली असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
“हा पुरस्कार आमच्या सर्व सन्माननीय खातेदार व हितचिंतकांनी दाखवलेल्या विश्वासाचे फलित आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला हा मानाचा सन्मान मिळाला,” अशी भावना संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
सहकार क्षेत्रात आदर्श कार्यपद्धती राबवत, अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधणाऱ्या या संस्थेच्या कामगिरीमुळे लातूर जिल्ह्याच्या सहकार चळवळीला नवे बळ मिळाल्याचेही उपस्थितांनी सांगितले.