बुलडाणा अर्बनचा माणुसकीचा परिचय; ६.४२ लाखांच्या विम्यातून गंधवाले कुटुंब सावरले! 
Co-op Credit Societies

बुलडाणा अर्बनचा कोतोली येथील सभासदासाठी मदतीचा हात

बुलडाणा अर्बनची सामाजिक बांधिलकी; मृत सभासदाच्या कुटुंबाला ६.४२ लाखांचा विमा धनादेश सुपूर्द

Prachi Tadakhe

कोतोली: 'केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो' हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. कोतोली शाखेचे खातेदार राजाराम दिनकर गंधवाले यांच्या निधनानंतर, त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या आर्थिक संकटात सोसायटीने मदतीचा हात दिला असून, विमा योजनेअंतर्गत ६ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.

कर्जमुक्तीसह आर्थिक आधार

राजाराम गंधवाले यांचे अपघाती निधन झाल्याने गंधवाले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्यावर सोसायटीचे सुमारे ६ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र, बुलडाणा अर्बनच्या विमा संरक्षण योजनेमुळे हे संपूर्ण कर्ज फिटले असून, त्याव्यतिरिक्त ५ हजार रुपये जादा अशी एकूण ६ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या वारसदार पत्नी सारिका राजाराम गंधवाले यांना धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली. यामुळे हे कुटुंब पूर्णपणे कर्जमुक्त झाले असून त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), अध्यक्ष मा. डॉ. सुकेशजी झंवर साहेब, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. कोमलताई झंवर मॅडम आणि मुख्य सरव्यवस्थापक मा. कैलास कासट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते. "सोसायटीचा प्रत्येक सभासद हा केवळ ग्राहक नसून तो आमच्या परिवारातील एक महत्त्वाचा घटक आहे," हा विचार क्षेत्रीय व्यवस्थापक मा. भालेराव साहेब व कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक मा. श्री. अनिल वानखेडे यांच्याकडून नेहमीच जोपासला जातो. याच भावनेतून गंधवाले कुटुंबाला ही तातडीची मदत देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

धनादेश वितरण प्रसंगी कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. अनिल वानखेडे, गुरुनाथ लोखंडे, कोतोली शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. प्रल्हाद मिसाळ यांच्यासह सोसायटीचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

बुलडाणा अर्बनच्या या संवेदनशील निर्णयामुळे परिसरातून आणि सहकार क्षेत्रातून संस्थेचे मोठे कौतुक होत आहे. संकटाच्या काळात आपल्या सभासदाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संस्था म्हणून बुलडाणा अर्बनने पुन्हा एकदा आपला नावलौकिक सिद्ध केला आहे.

SCROLL FOR NEXT