गेल्या बारा वर्षांपासून बँकोच्या माध्यमातून या पुरस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून,सहकारी पतसंस्थांच्या कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. यासाठी इच्छुक पतसंस्थांना त्यांच्या कामकाजासंदर्भातील माहिती प्रश्नावलीद्वारे सादर करावी लागणार आहे. संबंधित प्रश्नावली संस्थांना पाठविण्यात आली असून, त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची अचूक माहिती भरून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.'बँको-पतसंस्था ब्लू रिबन २०२६' साठी पाच मुख्य प्रकारची वर्गवारी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध सहकारी पतसंस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रश्नावलींचा अभ्यास करून निर्धारित निकषांनुसार संस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यानंतर पात्र संस्थांची निवड करून त्यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक श्रेणीतील संस्थांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन करून गुणांकनानुसार पुरस्कारांचे वर्गीकरण केले जाणार आहे.
सहभागी होणाऱ्या पतसंस्थांनी पूर्ण भरलेली प्रश्नावली १८ डिसेंबर २०२६ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. तसेच संस्थेचा मागील व चालू वर्षाचा वार्षिक अहवालही प्रश्नावलीसोबत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांचे वितरण जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बँको ॲडव्हान्टेज सहकार परिषद २०२७’ या कार्यक्रमात केले जाणार आहे. या माध्यमातून सहकारी पतसंस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येणार आहे.
बँको-पतसंस्था ब्लू रिबन २०२६ परीक्षण समिती,
द्वारा अविज पब्लिकेशन, मधुसुदन रेसिडेन्सी, महालक्ष्मी नगर, गोखले कॉलेजजवळ, कोल्हापूर - ४१६ ०१२
फोन : ०२३१-२६४२०९४, २६४२१९४, २६४२२९४
टीप: कृपया सोबत जोडलेली प्रश्नावली पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूर्ण भरून, सही व शिक्क्यासह, संस्थेचा मागील व चालू वर्षाचा वार्षिक अहवाल जोडून वरील पत्त्यावर पाठवावी. अर्धवट अथवा चुकीची माहिती असलेली प्रश्नावली मूल्यांकनासाठी अपात्र ठरवली जाईल.