अमृत सेवक सहकारी पत संस्थेच्या सभेत बोलत असताना अध्यक्ष सुधीर कामेरीकर. समोर सभासद 
Co-op Credit Societies

अमृत सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर

Pratap Patil

वारणानगर: येथील तात्यासाहेब कोरेनगरस्थित अमृत सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सभेत संस्थेने अहवाल सालात २२२ कोटींची उलाढाल (व्यवसाय) केली असून सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक,अध्यक्ष सुधीर कामेरीकर यांनी केली. यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक शिवाजी जंगम, मॅनेजर बी. बी. चौगुले, प्रवीण शेलार, शरद शेटे, अशोक पाटील, अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.

संचालक केरबा कुंभार यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. उपाध्यक्ष एन. बी. धमाल यांनी मनोगत व्यक्त केले. आय. आय. सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सुधीर कामेरीकर यांच्या अभिनंदनाचा ठराव करून उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे संचालक उत्तम कदम यांनी स्वागत केले. सचिव उदय निकम यांनी विषय वाचन केले. संचालक तानाजी वरपे यांनी आभार मानले.

संस्थेचे संचालक श्री.उत्तम कदम यांनी स्वागत केले विषय वाचन सचिव उदय निकम यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले.

सर्व संचालक, कर्मचारी तसेच सभासद वारणा दुध संघाचे संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक शिवाजी जंगम, पर्सोनेल मॅनेजर बी.बी. चौगुले, अंकौटस् विभागाचे प्रवीण शेलार, शरद शेटे, अशोक पाटील, अनिल हेर्ले, ई. बी. माने, डॉ. वडजे, डॉ.जे.बी. पाटील, नवनाथ सूर्यवंशी, सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक केरबा कुंभार यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. संचालक तानाजी वरपे यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT