नवे पारगाव,अंबप (ता. हातकणंगले) येथील सुरेश बापूसाहेब पाटील वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.अध्यक्षस्थानी माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील होते. सभेत संस्था समूहाचे प्रमुख ॲड. राजवर्धन पाटील म्हणाले, "संस्थेची वार्षिक उलाढाल ३८ कोटी ७ लाख झाली असून संस्थेस १६ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झालेला आहे." ॲड. पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन आगामी काळातील योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील, प्रमुख पाहुणे महादेव तेली, उपाध्यक्ष पी. एस. लोकरे, स्वरूप कार्वेकर, नागेश घेवारी यांची भाषणे झाली. सभेस संचालक आण्णासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, संतोष माळी, महादेव शिंदे, अनिल शिंदे, भीमराव वाघमोडे, कृष्णात गायकवाड, शहाजी दाभाडे, नेताजी कांबळे, शुभांगी उंडे, नंदा दाभाडे, नागेश घेवारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.