आर्थिक कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
निव्वळ नफा: चालू आर्थिक वर्षात संस्थेने ₹३१.८१ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
ठेवी व उलाढाल: संस्थेच्या ठेवी ₹७.७७ कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल करत असून एकूण उलाढाल वेगाने वाढत आहे.
कर्जवाटप: संस्थेचे एकूण कर्जवाटप ₹५ कोटी ९६ लाख रुपये झाले आहे.
एनपीए (NPA) नियंत्रण: अत्यंत शिस्तबद्ध वसुली नियोजनामुळे संस्थेची थकबाकी अवघी ५% राहिली असून, ढोबळ एनपीए (Gross NPA) १०% वर मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. तर निव्वळ एनपीए (Net NPA) ३.८६% इतका नियंत्रित आहे.
गुणवंतांचा व सभासदांचा सत्कार:
वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेले पतसंस्थेचे सभासद, गुणवंत विद्यार्थी, तसेच निष्ठावंत ठेवीदार व कर्जदार यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सभेदरम्यान उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्षांनी समर्पक उत्तरे दिली. उपस्थितांनी संस्थेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
मान्यवरांची उपस्थिती:
या सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. दिगंबर गंगाराम गोरके, उपाध्यक्ष श्री. किशोर सदाशिव सालप, संचालक उमेश बने, सुरेश अनिवसे, श्रीधर कांगणे, अंकुश घाणेकर, नरसिंह तुंगीकर, संजय उत्तेकर, सौ. स्मिता साळवी, सौ. अनुपमा कांगणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौ. पल्लवी धनवडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.