'यूथ डेव्हलपमेन्ट को-ऑप. बँक 
Co-op Banks

कोल्हापुरातील 'यूथ डेव्हलपमेन्ट को-ऑप. बँके'त विविध पदांची भरती

२२ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Prachi Tadakhe

कोल्हापूर: सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या यूथ डेव्हलपमेन्ट को-ऑप. बँक लि., कोल्हापूर येथे रिक्त असलेल्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये अकौंट्स ऑफिसर, शाखाधिकारी आणि लोन ऑफिसर या पदांचा समावेश असून, इच्छुक उमेदवारांना २२ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

१. अकौंट्स ऑफिसर (Accounts Officer)

  • शैक्षणिक पात्रता: बी.कॉम, एम.कॉम किंवा MBA (Finance). उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. JAIIB उत्तीर्ण असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

  • अनुभव: गुंतवणूक आणि अकौंटिंग विभागातील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

  • वयोमर्यादा: ३० ते ४५ वर्षे.

२. शाखाधिकारी (Branch Manager)

  • शैक्षणिक पात्रता: बी.कॉम किंवा एम.कॉम. JAIIB असल्यास प्राधान्य.

  • अनुभव: बँकिंग क्षेत्रातील शाखाधिकारी पदाचा किमान २ वर्षांचा अनुभव किंवा असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून कामाचा अनुभव आवश्यक.

  • वयोमर्यादा: ३० ते ४५ वर्षे.

३. लोन ऑफिसर (Loan Officer)

  • शैक्षणिक पात्रता: बी.कॉम किंवा एम.कॉम. JAIIB असल्यास प्राधान्य.

  • अनुभव: कर्ज मागणी अर्जांचे पृथक्करण (Analysis), रेशो अनॅलिसिस, खेळते भांडवल मूल्यांकन, सातबारा व प्रॉपर्टी कार्डचे ज्ञान असणे आवश्यक. कर्ज विभागात काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

  • वयोमर्यादा: ३० ते ४५ वर्षे.

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत:

इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण तपशील (Resume) आणि फोटोसह पदाचा स्पष्ट उल्लेख करून 'कार्यकारी संचालक' यांच्या नावे अर्ज सादर करायचा आहे.

  • अंतिम तारीख: २२ एप्रिल २०२६.

  • ऑनलाइन अर्ज: उमेदवारांनी आपले अर्ज dmachindra@youthbank.co.in या ईमेल आयडीवर पाठवावेत.

  • ऑफलाइन/पोस्टाने अर्ज करण्याचा पत्ता: प्रधान कार्यालय: ६४६ ई, 'पेंढारकर कॉम्प्लेक्स', व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी, कोल्हापूर - ४१६००१.

  • अधिक माहितीसाठी संपर्क: ०२३१-२५५०१२० / २१.

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक श्री. आर. बी. सूर्यवंशी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT