श्री यशवंत सहकारी बँक 
Co-op Banks

श्री यशवंत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री.प्रकाश देसाई

करवीर तालुक्यातील कुडित्रे-कोपार्डे येथील बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय.

Vijay chavan

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुडित्रे-कोपार्डे येथील श्री यशवंत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री.प्रकाश पांडुरंग देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,करवीर तालुका येथील श्री.प्रेमदास राठोड यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी श्री.महेश दिनकरराव पाटील (शिंगणापूरकर) यांनी श्री.प्रकाश देसाई यांच्या नावाची सूचना केली, तर श्री.नंदकुमार आण्णासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर देसाई यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष व विद्यमान संचालक श्री. महेश पाटील (शिंगणापूरकर), तसेच संचालक श्री.अमर पाटील (शिंगणापूरकर) आणि श्री.नंदकुमार पाटील यांनी नूतन अध्यक्षांचे अभिनंदन केले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री.प्रकाश देसाई यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँकेचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने चालविण्याची ग्वाही दिली. तसेच सर्वांच्या सहकार्याने बँकेच्या कामकाजाला पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

बँकेचे संचालक श्री.विश्वास रा. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीला बँकेचे उपाध्यक्ष श्री.दिलीप खाडे, संचालक श्री.भगवंत पाटील, डी. के. पाटील, सर्जेराव शेलार, कुंडलिक पाटील, प्रल्हाद खाडे, एम. एस. पाटील, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, कुलभूषण पाटील, जयसिंग सूर्यवंशी, बाबूराव रानगे, शोभा करपे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रमेश पाटील उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT