वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन आशय राऊत व बँकेचे इतर पदधिकारी 
Co-op Banks

वसई विकास सहकारी बँकेची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांना ६ टक्के लाभांश जाहीर

Pratap Patil

वसई विकास सहकारी बँकेची ४२ वी वार्षिक सभा नुकतीच देवतलाव येथील वसई शेतकरी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली. खेळीमेळीत झालेल्या या सभेत बँकेला २४-२५ या वर्षात ६.८० कोटींचा निव्वळ नफा झाल्याचे तसेच बँकेतर्फे भागधारकांना ६ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी चेअरमन आशय राऊत यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. सद्या बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बँकेने मोबीफास्ट ॲप सुरु केले असून ते ग्राहकाभिमुख ठरले आहे. लवकरच यामध्ये बिल मेन्टचे सुविधा सुरु करण्यात येणार आहे. बँकेचे सभासद,भागधारक,संचालक,अधिकारी,कर्मचारी एकत्रित काम करत असल्याने बँकेला यावर्षात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

२४-२५ ह्या वर्षात बँकेचे भागभांडवल ३४.२२ वरून ३४. ८७ कोटी झाले आहे. बँकेच्या ठेवी १५५४ कोटी आहेत. २०२४-२५ ह्या काळात सभासद कल्याण निधीतून एकंदर ८९ सभासदांना २३. १६ लाखांची मदत करण्यात आली आहे. या वार्षिक सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर यांनी बँकेच्या एकंदरीत प्रशासकीय व आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. कार्यक्रमास सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हाईस चेअरमन शिरीष राऊत यांनी आभार मानले

SCROLL FOR NEXT