पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि, पुणे (महाराष्ट्र)
४९/१ ऋतुरंग संकुल, सी.डी. बिल्डिंग,अरण्येश्वर कॉर्नर,पर्वती, पुणे ४११ ००९
श्री स्वामी समर्थ सह बँक लि. मुख्य कार्यालय टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहिल्यानगर या बँकेसाठी प्रशिक्षणार्थी लिपिक या पदासाठी उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
१. पदसंख्या :- १९
२. आवश्यक पात्रता :- अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी,
ब) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र (Equivalent Certification Course) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
क) वयोमर्यादा किमान: २२ ते ३५ वर्षे (दिनांक ३१/०८/२०२५ रोजी)
३. अनुभव :- बँका / पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
४. प्राधान्य :- पदव्युत्तर पदवी, JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM/IIBF / VAMNICOM) बँकिंग / सहकार कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य
५. कामाचे कार्यक्षेत्र : बँकेचे शाखांचे ठिकाणी
६. शुल्क :- लेखी परीक्षा शुल्क रु ७२६/- (जीएसटी सह)
तरी वरील पात्रता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती व ईमेल ॲड्रेससह पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे (महाराष्ट्र) www.punebankasso.com या बेबसाईटवरील गुगल फॉर्म भरुन माहिती प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या www.punebankasso.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जासोबत ना परतावा (Non refundable) तत्त्वावर पाठवावयाचे परीक्षा शुल्क रु ७२६/- ( जीएसटी सह) असोसिएशनच्या खालील बँक खात्यामध्ये NEFT / RTGS व्दारे जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत जोडावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविले असल्यास त्याचा तपशिल अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. तसेच जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता व अटींची पूर्तता न केलेल्या उमेदवारांनी अर्ज केल्यास परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही व त्यांचा अर्जही बाद होईल याची नोंद घ्यावी.
असोसिएशनच्या बँक खात्याचा तपशील :-
Pune District Urban Co-op. Banks Association Ltd., Pune Cosmos Co-operative Bank Ltd., Parvati Darshan Branch, Saving A/c No.0010501028653
IFS Code- COSB0000001