शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड 
Co-op Banks

शरद नागरी सहकारी बँकेत भरती प्रक्रिया सुरू; ८ फेब्रुवारीला थेट मुलाखती

सोलापूरमध्ये बँकिंग क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी मोठी संधी

Vijay chavan

शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर यांच्या प्रधान कार्यालयामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे.

बँकेचे प्रधान कार्यालय २१८/२१९ ब, गोल्ड फिंच पेठ, लकी चौक, सोलापूर – ४१३००७ येथे असून संपर्क क्रमांक (०२१७) २६२७३५५ असा आहे.

भरती होणारी पदे व पात्रता

१) ज्युनियर ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :
बी.कॉम., एम.कॉम., बी.सी.ए., एम.सी.ए. (संगणक ज्ञान आवश्यक)
अनुभव :
किमान १० वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव अनिवार्य

२) लिपिक (क्लार्क)

शैक्षणिक पात्रता :
बी.कॉम., एम.कॉम., बी.सी.ए., बी.बी.ए., एम.सी.ए. (संगणक ज्ञान आवश्यक)
अनुभव :
अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य

३) शिपाई

शैक्षणिक पात्रता :
किमान १२ वी उत्तीर्ण
अनुभव :
अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

थेट मुलाखतीची माहिती

बँकिंग क्षेत्रातील अनुभवी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह शरद नागरी सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT