शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड  
Co-op Banks

नांदेडच्या शंकर नागरी बँकेची ५०० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

२०२५-२६ आर्थिक वर्षात ४०० कोटींचा टप्पा पूर्ण

Prachi Tadakhe

नांदेड: राज्यातील सहकार क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. बँकेने ४०० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा (Total Business) टप्पा यशस्वीपणे ओलांडला असून, आता ५०० कोटींच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे.

आर्थिक कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये (३१ मार्च २०२६ अखेर):

बँकेने जाहीर केलेल्या आर्थिक आकडेवारीनुसार, सर्वच क्षेत्रांत बँकेने प्रगतीचा आलेख उंचावला आहे:

  • एकत्रित व्यवसाय: ४०० कोटी रुपये.

  • एकूण ठेवी: २५२ कोटी रुपये.

  • कर्ज वाटप: १४६ कोटी रुपये.

  • गुंतवणूक: ११३ कोटी रुपये.

  • निव्वळ नफा: १ कोटी ६० लाख रुपये (सर्व तरतुदी वजा जाता).

  • सी.डी. रेशो: ५७.८५ टक्के.

  • एन.पी.ए. नियंत्रण: बँकेने आपला 'नेट एन.पी.ए.' १.७०% इतका अल्प राखून आर्थिक शिस्तीचा परिचय दिला आहे, तर ग्रॉस एन.पी.ए. ५.७१% आहे.

विश्वासाची आणि पारदर्शकतेची साक्ष

बँकेचे सीईओ विक्रम राजे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की,

"ही प्रगती केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. आमचे पारदर्शक व्यवस्थापन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला अढळ विश्वास यामुळेच हे शक्य झाले आहे."

सध्या बँकेच्या १० शाखांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली जात आहे.

बँकेच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा तसेच सर्व संचालक मंडळ आणि व्यवस्थापन मंडळाने कर्मचारी, सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे.

शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड स्थानिक सल्लागार मंडळ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या संचालक मंडळात श्री.शेखर देसरडा, श्री.गोपाल अजमेरा, शिवनाथ राठी, रुपेश कुमार सारडा, माधवराव निटोरे, डॉ. गौतम संचेती आणि डॉ. पवन डोंगरे यांसारख्या तज्ज्ञांचा समावेश आहे. तसेच, कर्मचाऱ्यांमध्ये संजय रामावत (शाखाधिकारी), अमोल उपाध्ये (अधिकारी), सुरज पैठणकर (लिपिक), विनया ताकवाले (लिपिक), रामदास पांचाळ (शिपाई) हे आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडत आहेत.

SCROLL FOR NEXT