शंकर सहकारी बँक 
Co-op Banks

शंकर सहकारी बँक नांदेड, लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा

आरबीआयकडून मिळाली परवानगी

Pratap Patil

नांदेड येथील दि शंकर नागरी सहकारी बँकेच्या विविध लोकोपयोगी सोयी-सुविधांमध्ये सतत वाढ होत असून, ग्राहकांना अत्यंत सोयीची व अत्यावश्यक असणारी मोबाईल बँकिंग सेवा सुरु करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच परवानगी दिली आहे. या माध्यमातून ग्राहकांना युपीआय, आयएमपीएसच्या विविध सेवा लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेडचे वित्तीय वर्षातील भाग भांडवल ७ कोटी ३० लाख, राखीव निधी ९ कोटी ९८ लाख, ठेवी २४४ कोटी ६४ लाख, कर्ज १४३ कोटी ७९ लाख, नफा १ कोटी ३१ लाख, नेट एनपीए १.७२ टक्के एवढे आहे. वैधानिक लेखा परिक्षकांनी बँकेस 'अ' वर्ग प्रदान केलेला आहे व बँक एफएसडब्ल्यूएमचे नॉर्मस् सुद्धा पूर्ण करीत आहे.

यापूर्वी शंकर नागरी सहकारी बँकेने एटीएम सुविधा, मिस कॉल सुविधा, ऑनलाईन टॅक्स पेमेंट सुविधा, आरटीजीएस/एनईएफटी, ई-कॉम. सुविधा, ई-स्टेटमेंट, एसएमएस अलर्ट, क्युआर कोड इ. सुविधा प्रदान केलेल्या आहेत, अशी माहिती बँकेचे सीईओ विक्रम राजे यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT