पारदर्शक कारभार अन् विश्वासाची परंपरा; सातारा शिक्षक बँकेच्या प्रगतीचे मंत्री शिवेंद्रराजेंकडून कौतुक 
Co-op Banks

शिक्षक बँक ही विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण सेवा देणारी बँक: ना. शिवेंद्रराजे भोसले

ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पारदर्शक कारभाराची प्रशंसा; नूतन उपाध्यक्ष नितीन राजे यांचा नागरी सत्कार

Prachi Tadakhe

कण्हेर : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने नेहमीच सभासदांच्या हिताला अग्रक्रम देऊन काम केले आहे. बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून दिवसेंदिवस होत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे. ग्राहकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण सेवांमुळे ही बँक आज विश्वासाचे दुसरे नाव बनली आहे, असे गौरवोग्रार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.

शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन राजे यांचा ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी तालुका शिक्षक संघाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक सभासद उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नूतन उपाध्यक्ष नितीन राजे म्हणाले,

"शिक्षकांनी व सभासदांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. बँकेचा लौकिक आणि विश्वासार्हता उत्तरोत्तर वाढत राहावी यासाठी मी कटिबद्ध असेन. सर्व पदाधिकारी व सभासदांना सोबत घेऊन, एकमुखाने व सहकार्याच्या भावनेने बँकेचा कारभार अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील."

या कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल जायकर, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सदाशिव कणसे, सरचिटणीस दीपक पवार, उपाध्यक्ष गजानन धुमाळ, राजेंद्र लोखंडे, कार्याध्यक्ष रवींद्र चतुर, तसेच शिक्षक संघाचे नेते दत्तात्रय कोरडे, अतुल कुलकर्णी, गजानन वाईकर, बाळकृष्ण जगताप, दत्तात्रय गवळी, संदीप हिरवे यांच्यासह अनेक मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT