सटाणा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदावर दिलीप येवला यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान चेअरपर्सन कल्पना येवला यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपला राजीनामा दिल्यानंतर बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता बागलाणचे सहाय्यक निबंधक राजीव इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली
चेअरमन पदासाठी मिळालेला एकमेव अर्ज दिलीप येवला यांचा असल्याने त्यांची निवड एकमताने जाहीर करण्यात आली. या निवडीत संचालक महेश देवरे यांनी सुचक तर रमणलाल छाजेड यांनी अनुमोदक म्हणून भूमिका बजावली.
निवडीनंतर नूतन चेअरमन दिलीप येवला यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या शाखाविस्तारासह प्रशासनातील सुसूत्रता व कामकाजातील गुणवत्तावाढीवर भर देणार असल्याचे सांगितले. बँकेच्या ग्राहकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या वेळी व्हा. चेअरमन चंद्रकांत सोनवणे, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्निल बागड, सचिन कोठावदे, विठ्ठल येवलकर, महेश देवरे, अभिजीत सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रविण बागड, भास्कर अमृतकर, कल्पना येवला, जगदिश मुंडावरे, प्रकाश सोनग्रा, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे उपस्थित होते.