सांगोला अर्बन को-ऑप बँक लि. 
Co-op Banks

सांगोला अर्बन को-ऑप बँक लि., सांगोला येथे विविध पदांसाठी भरती जाहीर

CEO, GM, शाखाधिकारी, आयटी अधिकारी आणि मार्केटिंग ऑफिसर पदांसाठी अर्ज मागविले; २० मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Vijay chavan

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अर्बन को-ऑप बँक लि., सांगोला यांनी विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

उपलब्ध पदांमध्ये

  • मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO),

  • महाव्यवस्थापक (GM),

  • शाखाधिकारी (Branch Manager),

  • आयटी अधिकारी (IT Officer)

  • मार्केटिंग ऑफिसर

या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आवश्यक कौशल्ये नमूद करण्यात आली असून बँकिंग क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी पदव्युत्तर शिक्षणासोबत बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदावरील अनुभव आवश्यक आहे.

  • महाव्यवस्थापक व शाखाधिकारी पदांसाठी बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील अनुभव, तसेच संबंधित व्यावसायिक पात्रता अपेक्षित आहे.

  • आयटी अधिकारी पदासाठी संगणक अभियांत्रिकी किंवा संबंधित शाखेतील पदवी व बँकिंग सॉफ्टवेअरचा अनुभव आवश्यक आहे.

  • मार्केटिंग ऑफिसर पदासाठी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून विक्री व मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव अपेक्षित आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडाटा, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती आणि संपर्क तपशीलासह अर्ज पाठवावा.

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ आहे.

  • अर्ज ई-मेलद्वारे career@sangolaurbanbank.com या पत्त्यावर पाठवावेत

    किंवा सांगोला येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावेत.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. sangolaurbanbank.com पात्र उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
SCROLL FOR NEXT