श्री समर्थ सहकारी बँकेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिकमध्ये संपन्न 
Co-op Banks

श्री समर्थ बँकेत डिजिटल व्यवहारांसाठी क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ!

३२ व्या वार्षिक सभेत आर्थिक मजबुतीचा लेखाजोखा;विनातारण कर्ज योजनांसह कर्मचाऱ्यांचा गौरव.

Prachi Tadakhe

नाशिक: श्री समर्थ सहकारी बँकेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २६ जुलै २०२६) नाशिक येथे प्रभारी चेअरमन मनोज अरुण बाग यांच्या अध्यक्षतेखाली सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत बँकेच्या डिजिटल विस्ताराचा भाग म्हणून ग्राहकांसाठी नवी 'क्यूआर कोड' (QR Code Payment) सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली.

दीपप्रज्वलनाने सभेची सुरुवात झाल्यानंतर प्रभारी चेअरमन मनोज बाग यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून बँकेला ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे. सध्या बँकेच्या एकूण ठेवी रु. १६६ कोटी ६ लाख ५६ हजार, तर एकूण कर्जे रु. ९१ कोटी ६ लाख ७४ हजार इतकी आहेत. बँकेचा नेट एनपीए (Net NPA) ०.७४% असून निव्वळ नफा रु. ७४ लाख २६ हजार झाला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एनपीए खात्यांतून रु. ३७८.५४ लाखांची वसुली झाल्याने बँकेचा नेट एनपीए आता शून्य टक्के झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बँकेच्या आधुनिकीकरणावर भर देताना प्रभारी चेअरमन मनोज बाग यांच्या हस्ते 'क्यूआर कोड पेमेंट' सेवेचे उद्घटन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात १० ग्राहकांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. तसेच ऑनलाईन बँकिंग सुरू करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी बँकेतर्फे नवीन 'हाऊसिंग लोन टॉप-अप' योजना जाहीर करण्यात आली. तसेच एम.एस.एम.ई. आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या 'आई' योजनेअंतर्गत प्रवासी व कमर्शियल वाहन खरेदीसाठी रु. २५ लाखांपर्यंतच्या कर्जास दुय्यम तारणाची (Collateral) आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा करण्यात आली. याशिवाय अमृत योजना, पिंक रिक्षा कर्ज, गृहकर्ज, सोनेतारण, अॅग्रिकल्चर अलाईड लोन आणि उत्सव कर्ज योजनेअंतर्गत माफक व्याजावर विविध कर्ज योजना राबविल्या जात असून ग्राहकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले.

मागील आर्थिक वर्षात कर्ज वाटप व वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बँकेच्या कर्मचाऱ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सर्व सभासदांनी बँकेच्या कारभाराबद्दल व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात बँकेचे सभासद व मार्गदर्शक श्री. राधाकृष्ण नाईकवाडे, डॉ.श्री. रविकिरण निकम, श्री. नरेंद्र कुलकर्णी, श्री. मकरंद सुखात्मे, डॉ.श्री प्रशांत पुरंदरे, श्री. बाळकृष्ण कुलकर्णी, श्री. अरुण भांड, श्री. मंगेश मालपाठक, श्री. सुहास पाटील, सौ. हेमा दशपुत्रे सहभागी होते. तसेच सभासद श्री. मुकुंद कुलकर्णी श्री.सुहास भणगे,श्री.प्रमोद पुराणिक, सीए श्री.प्रशांत कुलकर्णी, श्री. ज्ञानेश देशपांडे, श्री. प्रवीण कुलकर्णी, श्री.अमित सर्वज्ञ, श्री.विश्वनाथ भवर, श्री. संदीप गोसावी, श्री. संतोष कमोद, श्री. मदाने श्री. उत्तम दोंदे तसेच विविध क्षेञातील बॅंकेच्या सन्माननीय मान्यवर सभासद यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.

या सभेला बँकेचे संचालक राजेश गांगुर्डे, शिरीष मोराणकर, राजेंद्र खेडलेकर, मंदार तगारे, सौ. योगिता खांडेकर, किशोरी एकबोटे (सौ. दीप्ती पंडित), सीए रुपाली जुन्नरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चितोडकर, सरव्यवस्थापक दीपक ठाकूर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सभासद व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संचालक मंदार ओलतीकर यांनी केले, तर संचालक पुष्कर पाराशरे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

SCROLL FOR NEXT