सहकार सप्ताह — ‘सहकारातून समृद्धी’ या संदेशासह साजरा 
Co-op Banks

सहकार सप्ताह — ‘सहकारातून समृद्धी’ या संदेशासह साजरा

नवीन गीताने केले प्रेरणादायी अभिवादन

Prachi Tadakhe

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने व वार्षिक सहकार सप्ताह (14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, 2025) च्या पार्श्वभूमीवर स्थानिक सहकारी समित्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वर्षीच्या सहकार सप्ताहाला वेगळे तेज देण्यासाठी व्याख्याते व वसुली सल्लागार प्रकाश नारायणराव जाधव यांनी एक प्रेरणादायी “सहकार गीत” तयार केले आहे. या गीतात सहकाराच्या तत्त्वांची महती, प्रशिक्षणाचे महत्व आणि समाजातील गरजवंतांसाठी तत्पर राहण्याचा संदेश भावपूर्ण शब्दांत मांडण्यात आला आहे.

सहकार गित

सहकारातून समृद्धी, हे ब्रीद आमुचे असे |

बिना प्रयत्न ते, होईल साध्य कसे ||

सहकारासाठी एक होऊनी, गित यशाचे गाऊ |

गरजवंताची गरज भागविण्या नका वाट पाहू ||

पतसंस्थांची उंची गाठण्या, घेऊ आम्ही प्रशिक्षण |

त्या साठी महत्त्वाचा, आहे प्रत्येक क्षण ||

ज्ञानाची ज्योत लावूनी, करू सर्वत्र प्रकाश |

उंच भरारी घेण्यासाठी, कमी पडे आकाश ||

शिस्त आणि प्रशिक्षण, होता शिवबाचा गनिमी कावा |

संस्थेच्या वृद्धी साठी, हा बोध तुम्ही घ्यावा ||

सहकारातून समृद्धीची, नाही दुजी वाट |

प्रशिक्षणामुळे समस्त, उजाडेल नवी पहाट ||

  जय सहकार

   स्वरचित

प्रकाश जाधव यांच्या गीताने साधेपणातही मोठा संदेश दिला आहे: सहकार्य आणि प्रशिक्षण हेच भावी प्रगतीचे मुख्य पाऊल. पुढील टप्प्यात सहकारी संस्थांसाठी दीर्घकालीन धोरण, डिजिटल-प्लॅटफॉर्मवर मजबूत उपस्थिती आणि तरुणांची सहभागीता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT