सातारा येथील दि रयत सेवक को-ऑप बँक लि; सातारा ही २१ शाखांद्वारे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली व एकूण २७०० कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी सहकारी बँक आहे. बँकेत रिक्त असलेल्या १३ सहाय्यक (लिपिक) असिस्टंट व १४ शिपाई (अटेंडंट) पदांकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक तपशिलाकरिता https://sznsbal.in या वेबसाईटला भेट द्या. सदर परीक्षेसाठी परीक्षा शुल्क रु. ७५०/- परीक्षा शुल्क + १८% जीएसटी + Applicable Bank Transaction Charges राहील. इच्छुक उमेदवारांनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांत आपले अर्ज ऑनलाइन पध्दतीने दि. १०/९/२०२५ पासून ते दि. २४/९/२०२५ रोजी सायं ५.०० वाजेपर्यंत पाठवावेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी
दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा.
मुख्य कार्यालय : ४५५/२/२० फ
पेठ सदरबझार, सातारा- ४१५००१. फोन नं. (०२१६२) २३१३१३, २३१३१४, २३१८३५ E-mail- ho@rsbs.co.in, est@rsbs.co.in