सचिव सुश्री मंजू राजपाल व उपस्थित मान्यवर  
Co-op Banks

राजस्थान राज्य सहकारी बँकेची वार्षिक सभा उत्साहात

२४-२५ मध्ये नोंदवला स्थापनेपासूनचा सर्वाधिक नफा!

Pratap Patil

राजस्थान राज्य सहकारी बँकेची (RSCB) ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सहकार विभागाच्या प्रशासक आणि प्रधान सचिव सुश्री मंजू राजपाल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी बँकेने स्थापनेपासूनची सर्वोच्च कामगिरी करीत आतापर्यंतचा सर्वाधिक नफा मिळवल्याचे जाहीर करण्यात आले.

बैठकीत, प्रशासकांनी माहिती दिली की, बँकेने आतापर्यंतचा सर्वाधिक ७८.२२ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवला आहे . बँक सीआरएआर, सीआरआर आणि एसएलआर मानदंडांसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या सर्व प्रमुख परिमाणांचे काटेकोर पालन करत आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, राजस्थानमधील केंद्रीय सहकारी बँकांनी ३१.१४ लाख शेतकऱ्यांना २३,४९४.२६ कोटी रुपयांचे अल्पकालीन पीक कर्ज वाटप केले. याव्यतिरिक्त, गोपाळ क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत २९,००० हून अधिक पशुपालकांना २३४.२२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले.

सुश्री राजपाल यांनी सदस्यांना मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या निर्देशांनुसार व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये विविधता आणण्याचे आणि अधिकाधिक तरुण आणि महिलांना सहकारी क्षेत्रात आणण्याचे आवाहन केले. त्यांनी "सहकार से समृद्धी" (सहकारातून समृद्धी) उपक्रमांतर्गत समाजातील प्राथमिक घटकांना बळकट करणे, सक्षमीकरण, सेवांचे आधुनिकीकरण आणि कामकाजात पारदर्शकता आणणे या प्रमुख तीन उद्दिष्टांवर भर देत, याकरिता कसून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शेतकरी उत्पादक संघटनांचे (FPOs) महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी सांगितले की ते PACS ची आर्थिक ताकद वाढवण्यात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि राहणीमान सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्याच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात दिलेल्या वचनबद्धतांची वेळेवर अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.प्रशासकांनी राज्य सरकार, आरबीआय आणि नाबार्ड यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाठक यांनी वेळापत्रकानुसार विषयपत्रिकेतील बाबी सादर केल्या, ज्या सर्वानुमते मंजूर करण्यात आल्या. वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या नफ्यातून १५.६४ कोटी रुपयांचा लाभांश वाटण्यासही मान्यता देण्यात आली.

पाठक यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली, ज्यात लॉकर हबची स्थापना करणे, उच्च कामगिरी करणाऱ्या पीएसीएसना मान्यता देणे आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे समाविष्ट आहे.

व्यवस्थापकीय संचालकांनी बैठकीचा समारोप करताना प्रत्यक्ष आणि आभासी दोन्ही प्रकारे सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आणि सहभागींचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT