पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकचे अमृत महोत्सवी वर्ष व ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने 'नारी शक्ती सन्मान' या विशेष कार्यक्रमाचे त्याच बरोबर मकरंद टिल्लू यांचा हास्ययोग या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन मुक्तांगण हायस्कूलच्या कै. दादासाहेब केतकर सभागृहात करण्यात आले होते. बँकेशी संलग्न अशा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये (वित्त, सामाजिक कार्य, क्रीडा, वैद्यकीय सेवा, शिक्षण, राजकारण, उद्योग-व्यवसाय इ.) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास स्वरूप वर्धिनी संस्थेच्या सहकार्यवाह तसेच बाल व महिला विभाग प्रमुख श्रीमती पुष्पाताई नडे व पुणे शहरातील प्रसिद्ध वकील व समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन लाभले.
स्वरूप वर्धिनीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालू असलेल्या कामास बॅकचे नेहेमीच सहकार्य व मार्गदर्शन मिळत आले आहे असे गौरव उद्गार श्रीमती पुष्पाताई नडे यांनी काढले व बँकेने आयोजित केलेल्या नारीशक्ती सन्मान कार्यक्रमाचे कौतुक केले. बँकेचा हा उपक्रम प्रेरणादाई असून, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. महिलांनी विविध कौशल्ये शिकून स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून त्यांना समाजात सन्मानाने जगता येईल.
उपस्थितांना मागदर्शन करताना डॉ. स्मिता जोशी म्हणाल्या कुटुंब व्यवस्था व त्यामुळे निर्माण होणारी नाती हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. त्यानुसार कुटुंब व्यवस्था व नाती सांभाळण्याचा प्रयत्न केल्यास जीवनातील अनेक समस्या पासून मुक्ती मिळूशकेल. समुपदेशक म्हणून काम करताना कुटुंब व्यवस्था व नात्यामधील वीण सैल होत आहे असे अनुभव अनेकवेळा येत आहेत. हि चिंतेची बाब असून सुखी जीवनासाठी प्रत्येकाने नाती जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, सुसंवाद साधने, समजून घेणे या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण हे सध्या करूशकतो. पुणे पीपल्स बँकेने हा कार्यक्रम आयोजित करून एक आदर्श घालून दिला आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना स्वीकृत तज्ञ संचालिका सौ. श्वेता ढमाळ यांनी केली या वेळी बँकेची ओळख करून बँकेचा स्थापनेपासूनचा प्रवास, बँकेची ग्राहकाभिमुख सेवा, तसेच सहकार तत्वावर आधारित बँकेची वाटचाल याबाबत माहिती दिली. तसेच बँकेचे संचालक मंडळ अत्यंत सुशिक्षित, अनुभवी व विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे आहे. उद्योग, व्यवसाय, कायदा, वित्त, अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या समृद्ध अनुभवामुळे बँकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये दूरदृष्टी आणि स्थैर्य दिसून येते. संचालक मंडळाच्या मार्गदर्शनामुळे बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून ग्राहक, सभासद आणि समाजाचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
यावेळी बँकेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड.सुभाष मोहिते म्हणाले, "बँकेच्या प्रगतीमध्ये व वाटचालीमध्ये संचालक, सेवक यांचे बरोबरच महिला खातेदार, विशेषतः विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या रणरागिणींचा महत्त्वाचा वाट आहे. त्यामुळेच अमृत मोहत्सवी वर्षात प्रतिनिधिक स्वरूपात त्यांचा सन्मान करून त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे." महिला सशक्तीकरण याचबरोबर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. या करीत बँकेने महिला आरोग्य पुस्तिका तयार केली असून बँकेच्या सर्व शाखांमध्ये महिलांकरिता याचे मोफत वाटप केले जाणार आहे.
बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी आपल्या भाषणात भारतीय महिलांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, "भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजावर अमिट ठसा उमटविला आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रथम भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अंतराळवीर कल्पना चावला, तसेच स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांसारख्या महान महिलांनी समाजाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या महिलांना प्रेरणा मिळते."
या कार्यक्रमाला बँकेच्या महिला संचालिका सौ. वैशाली छाजेड, सौ. निशा करपे, स्वीकृत तज्ञ संचालिका सौ. श्वेता ढमाळ, बँकचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड, व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष सुभाष मोहिते, संचालक सुभाष नडे, मिलिंद वाणी, विश्वनाथ जाधव, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य उदय जगताप. वैष्णवी गायकवाड, रेखा मोहिते, कांचन रणदिवे, भरती वाणी, प्रेमलता नडे, तसेच नगरसेविका सई थोपटे, सिद्धी शिळीमकर, लता गौडा, मिताली साळवेकर, शैलजा भोसले, आशा सूर्यवंशी, सरपंच संध्या ताई असवले, बँकेचे कर्मचारी, अधिकारी इ. मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सन्मानित महिलांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आभार प्रदर्शन संचालिका सौ. वैशाली छाजेड यांनी तर सूत्रसंचालन प्रिया निघोजकर यांनी केले.