निलेश ढमढेरे सर  
Co-op Banks

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निलेश ढमढेरे

सहकारी बँकिंगमधील नि:स्वार्थ कामाची पोचपावती

Pratap Patil

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे (महाराष्ट्र) ही महाराष्ट्र राज्यातील नावाजलेली मान्यताप्राप्त सहकारी प्रशिक्षण संस्था आहे.नागरी सहकारी बँकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने १९ मे १९७९ रोजी पुणे जिल्ह्यात या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बिनविरोध निवडी झाल्या असून अध्यक्षपदी पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. निलेश अण्णा ढमढेरे यांची, उपाध्यक्षपदी मा. रमेश शंकर वाणी तर सचिवपदी मा.ॲड. श्री. सुभाष विठ्ठल मोहिते यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन ही संस्था जवळपास चार दशकांपेक्षा जास्त काळ सदस्य बँकांना सक्रियपणे सेवा देत आहे. आजपर्यंत १०० हून अधिक बँका या संस्थेच्या सदस्य झालेल्या आहेत. अशा या प्रदीर्घ इतिहास असलेल्या संस्थेच्याअध्यक्षपदावर बिनविरोध निवड होणे म्हणजे त्या क्षेत्रात नि:स्वार्थीपणे केलेल्या कामाची पोचपावती मिळणेच आहे.

आदरणीय स्व. शिवाजीभाई ढमढेरे यांनी स्थापन केलेल्या असोसिएशनच्या अध्यक्षपदी मा. निलेशअण्णा ढमढेरे यांची निवड होणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मा. निलेशअण्णा यांना सहकार क्षेत्रात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. ते पुणे अर्बन बँकेची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनची जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना असल्याने त्यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आलेली आहे.

SCROLL FOR NEXT