ऑनलाईन गेमिंग 
Co-op Banks

ऑनलाईन गेमिंग: खेल-खेलमे हातोहात फसवणूक!

आपली गोपनीय माहिती नेहमीच जपली पाहिजे!

Pratap Patil

फावल्या वेळात किंवा रात्री झोप येत नाही म्हणून हातासरशी उपलब्ध असणारे मोबाईलवरील ऑनलाईन गेम खेळण्याकडे आबालवृद्धांचा कल वाढल्यामुळे ऑनलाइन गेमिंग हे आज सायबर गुन्हेगारांसाठी एक आकर्षक लक्ष्य बनले आहे. आभासी चोरी (इंटरनेटवरून किंवा संगणक प्रणालीतून माहिती, पैसे, डेटा, खाते तपशील किंवा ओळख चोरली जाणे.), खाते हॅकिंग, आर्थिक फसवणूक आणि ओळख चोरी यांसारखे अनेक धोके यातून उद्भवतात. हॅकर्स गेमिंग प्लॅटफॉर्मवरील त्रुटींचा गैरफायदा घेतात आणि खेळाडूंना फिशिंग स्कॅम (ओळखीची व्यक्ती असल्याचे भासवून मेसेज पाठवून माहिती चोरणे ), मालवेअर (संगणक किंवा मोबाईलला हानी पोहोचवणारे सॉफ्टवेअरद्वारे डेटा चोरी, सिस्टीम हॅक करणे) आणि सोशल इंजिनिअरिंगद्वारे (कोणीतरी मानसिक चलाखी वापरून /मानवी कमतरता हेरून (manipulation) फसवणे) तुम्हाला फसवतात.

याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या! (Dos):

  • प्रवेशावर देखरेख ठेवा: आपण पालक असल्यास, मुलांना केवळ आपल्या देखरेखीखाली ऑनलाईन गेम खेळण्याची परवानगी द्या.

  • खऱ्या पैशांच्या ॲप्सबाबत सावध रहा: अनेक "रिअल मनी गेमिंग" ॲप्स बनावट असू शकतात. संशयास्पद ॲप्सपासून दूर राहा.

  • ॲपना प्रवेश परवानग्या विचारपूर्वक द्या: संपर्क, स्टोरेज, लोकेशन इत्यादी परवानग्या देण्यापूर्वी काळजीपूर्वक पडताळणी करा.

  • वैयक्तिक माहितीचे संरक्षण करा: आपले पूर्ण नाव, पत्ता, बँक खात्याची माहिती यांसारखी संवेदनशील माहिती नेहमीच सुरक्षित ठेवा.

या गोष्टी टाळा! (Don’ts):

  • संशयास्पद स्रोतांपासून दूर रहा: अविश्वसनीय वेबसाईट्स किंवा स्रोतांवरून गेमिंग ॲप्स डाउनलोड करू नका.

  • "हमीदार परतावा" जाहिरातींवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडियावर किंवा जाहिरातींमधून हमीदार परतावा देणाऱ्या ॲप्स इन्स्टॉल करू नका.

  • गोपनीय माहिती शेअर करू नका: अनोळखी खेळाडूंना वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती देऊ नका.

  • सोशल मीडियावर अतिप्रमाणात शेअरिंग टाळा: गेममधील यश, स्कोअर इत्यादीबद्दल जादा माहिती शेअर केल्यास मानसिक त्रास होऊ शकतो किंवा तुम्ही सायबर हल्ल्याचे लक्ष्य बनू शकता.

SCROLL FOR NEXT