नागरी सहकारी बँक 
Co-op Banks

नागरी सहकारी बँकांना NUCFDC चे सभासदत्व घेण्याचे आवाहन

आर्थिक स्थैर्य व भांडवली सहाय्यासाठी महत्त्वाचे पाऊल

Vijay chavan

मुंबई : राज्यातील नागरी सहकारी बँकांनी National Urban Cooperative Finance and Development Corporation Ltd. (NUCFDC) या संस्थेचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन राज्य सहकारी विभागाने केले आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

परिपत्रकानुसार, नागरी सहकारी बँकांना आर्थिक स्थैर्य, भांडवली सहाय्य, तरलता (Liquidity) सुविधा आणि सुरक्षित कर्जरेषा (Secured Credit Lines) उपलब्ध करून देण्यासाठी NUCFDC कार्यरत आहे. तसेच बँकांचे आधुनिकीकरण, तंत्रज्ञानविषयक सुधारणा, सायबर सुरक्षा, क्षमता विकास (Capacity Building), तांत्रिक सहाय्य आणि सल्लागार सेवा यांसारख्या सुविधा देखील संस्थेमार्फत दिल्या जाणार आहेत.

राज्य सहकारी विकास महामंडळ (SCDC) मार्फत नागरी सहकारी बँकांना या संस्थेच्या सभासदत्वाबाबत माहिती देण्यात आली असून, अधिकाधिक बँकांनी यात सहभागी व्हावे, असे निर्देश देण्यात आले आहेत

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 अंतर्गत नागरी सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी आणि भविष्यातील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी NUCFDC महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील नागरी सहकारी बँकांनी National Urban Cooperative Finance and Development Corporation Ltd. (NUCFDC) चे सभासदत्व घेणेबाबत.pdf
Preview

सभासदत्वासाठी इच्छुक बँकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे :

Chairman / Chief Executive Officer,
National Urban Cooperative Finance and Development Corporation Ltd. (NUCFDC)
Office No. 04, Ground Floor, Windfall Building,
Sahar Plaza Complex, J.B. Nagar,
Andheri (East), Mumbai – 400059.

SCROLL FOR NEXT