नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेचा वर्धापनदिनानिमित्त गुणवंत पाल्यांचा 'गुणगौरव सोहळा' रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास मुख्य अतिथी, बँकेचे संचालक मंडळ, सभासद व गुणवंत विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रसिद्ध व्याख्याते मा. प्रा. श्री. गणेश आत्माराम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांनी आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे याचे ध्येय आधी निश्चित केले पाहिजे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर यश तुमच्यापासून कधीच दूर राहू शकत नाही."
तसेच कार्यक्रमास उपस्थित सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मा. क्षमा देशपांडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "कोणत्याही परिस्थितीत आपल्या उज्ज्वल भविष्याचा विचार करावा आणि ते ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. या प्रवासात आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना पूर्ण साथ दिली पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम अध्यक्ष तथा 'दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि. मुंबई'चे अध्यक्ष मा. श्री. अजय ब्रम्हेचा यांनी बँकेच्या कामगिरीचे कौतुक केले. रिझर्व्ह बँकेने (RBI) सन २०२५-२०२६ च्या आर्थिक पाहणीनुसार बँकेने ECBA निकषांचे तंतोतंत पालन केल्याचे नमूद केले आहे. बँकेला १०६ वर्षे पूर्ण झाली असून आरबीआयचा परवाना मिळण्याच्या काळापासून आपला बँकेशी जवळचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे अध्यक्ष मा. श्री. निलेश देशमुख यांनी बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आलेख मांडला:
एकूण सभासद संख्या: १४,८०४
भाग भांडवल: रु. २४ कोटी ८८ लाख
राखीव निधी: रु. ३६ कोटी ३० लाख
एकूण ठेवी: रु. ४०४ कोटी ४८ लाख
कर्जवाटप: रु. २७१ कोटी २० लाख
खेळते भांडवल: रु. ४७३ कोटी ८३ लाख
निव्वळ एन.पी.ए. (NPA): ०.९१% (३१ मार्च २०२६ अखेर)
ऑडीट वर्ग: सातत्याने 'अ' वर्ग
गुंतवणूक: १७९ कोटी ९७ लाख
या सोहळ्यास बँकेचे अध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष विनोद गवागे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद आढे, व्यवस्थापक (प्रशासन) अण्णासाहेब बडाख, संचालक मंडळाचे सर्वश्री प्रमोद निरगुडे, मंदाकिनी पवार, महेश मुळे, सुनिल गिते, जयंत शिंदे, अभिजीत घोडेराव, अमोल बागुल, प्रदिप अहिरे, अनिल वाघ, माजी पदाधिकारी उत्तमराव (बाबा) गांगुर्डे, दिलीप सलादे, रविंद्र थेटे, रमेश राख, विजयकुमार हळदे, सुधीर पगार, सुनिल बच्छाव, शिरीष भालेराव, बबनराव भोसले, संचालक महेंद्र बान्हे, दिलीप (नाना) सानप, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद आढे, व्यवस्थापक (प्रशासन) अण्णासाहेब बडाख, तसेच बँक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.