आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेने उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीमुळे आणि चोख आर्थिक नियोजनामुळे बँकेने यंदा २.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Net Profit) कमावला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँकेचा एनपीए (NPA) अवघा ०.९१ टक्के इतका नियंत्रित राखण्यात बँकेला यश आले आहे, जे बँकेच्या मजबूत आणि पारदर्शक आर्थिक स्थितीचे निदर्शक आहे.
बँकेच्या सद्यस्थितीचा विचार केला तर बँकेकडे सध्या ४६६.३२ कोटी रुपयांचे एकूण खेळते भांडवल उपलब्ध आहे. तसेच बँकेकडे ३९८.८० कोटी रुपयांच्या एकूण ठेवी (Deposits) जमा असून, बँकेने २७४.४७ कोटी रुपयांचे कर्जवाटप (Advances) केले आहे. याशिवाय बँकेची गुंतवणूक १६९.४६ कोटी रुपये इतकी असून, बँकेचा राखीव व इतर निधी ३४.०९ कोटी रुपये आणि भागभांडवल २४.८३ कोटी रुपये इतके मजबूत आहे.
बँकेने सभासदांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक गरजा ओळखून अत्यंत किफायतशीर दरात विविध कर्ज योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये घर खरेदीसाठी ५० लाख रुपये, मालमत्ता तारण कर्ज ५० लाख रुपये, वाहन कर्ज २५ लाख रुपये, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज १५ लाख रुपये आणि सोनेतारण कर्ज ५ लाख रुपयांपर्यंत दिले जात आहे.
बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कोअर बँकिंग (Core Banking) सेवा पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. यामुळे सभासदांना कोणत्याही शाखेतून आपले आर्थिक व्यवहार अत्यंत सुलभतेने आणि सुरक्षितपणे करता येत आहेत.
बँकेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करत, नागरिकांनी आणि सभासदांनी बँकेच्या अत्याधुनिक व पारदर्शक सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष नीलेश देशमुख आणि उपाध्यक्ष विनोद जवागे यांनी केले आहे.
याप्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री . प्रमोद भगवंतराव निरगुडे, श्री. अजित महेश आव्हाड, सौ. मंदाकिनी विलास पवार, श्री. महेश नारायण मुळे, सौ. धनश्री भालचंद्र कापडणीस, श्री. रविंद्र रघुनाथ बाविस्कर, श्री. सुनिल तबाजी गिते, श्री. मोहन रामचंद्र गांगुर्डे, श्री. ज्ञानेश्वर शंकरराव माळोदे, श्री. जयंत रंगनाथ शिंदे, श्री. विजय पाटीलभाऊ देवरे, श्री. रमेश तुकाराम बोडके, श्री. अभिजीत रमेश घोडेराव, श्री. सचिन कल्याणराव विंचुरकर, श्री. विक्रम विश्वनाथ पिंगळे, श्री. अमोल सुभाष बागुल, व्यवस्थापक श्री. अण्णासाहेब त्रिंबकराव बडाख, संचालक श्री. भरत वसंत राठोड व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. मिलींद गजानन आढे यांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बँकेच्या उत्कर्षासाठी कटिबद्धता व्यक्त केली आहे.