नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक 
Co-op Banks

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत वरिष्ठ पदांची भरती

८० शाखा आणि ४३४८ कोटींचा व्यवसाय असलेल्या मल्टि-स्टेट शेड्यूल्ड बँकेत कामाची संधी.

Prachi Tadakhe

नाशिक: उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि ४३४८ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय मिश्र असलेल्या 'द नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लि.' (नामको बँक) मध्ये विविध वरिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या कर्ज, लेखा, ऑडिट आणि रिकव्हरी विभागासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार रिक्त असलेल्या जागा आणि त्यासाठीची पात्रता खालीलप्रमाणे आहे:

१. पद: जनरल मॅनेजर (GM) / डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)

  • वयोमर्यादा: ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. (JAIIB/CAIIB, MBA फायनान्स/मार्केटिंग, IT किंवा बँकिंग ऑपरेशन्स असलेल्यांना प्राधान्य).

  • अनुभव: वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर (Senior Management) किमान ३ वर्षांचा अनुभव आणि कर्ज, लेखा, अनुपालन (Compliance), वसुली किंवा जोखीम व्यवस्थापन क्षेत्रात एकूण १० वर्षांचा अनुभव आवश्यक.

२. पद: मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer - CRO)

  • वयोमर्यादा: ३५ ते ५५ वर्षे.

  • शिक्षण: पदवीसह CAIIB अनिवार्य. सोबत खालीलपैकी एक पात्रता आवश्यक:

    1. ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून फायनान्शिअल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र.

    2. चार्टर्ड फायनान्शिअल ॲनलिस्ट (CFA).

    3. चार्टर्ड अकाउंटंट (CA).

    4. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (ICWA).

  • अनुभव: उच्च केडरमध्ये ५ वर्षांचा अनुभव. क्रेडिट ॲनलिस्ट किंवा इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.

अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अपेक्षित पगारासह (Salary Expectation) जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत बँकेकडे पाठवणे आवश्यक आहे.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय कार्यालय: A-16, इंडस्ट्रियल इस्टेट, पद्मश्री बाबूभाई राठी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, सातपूर, नाशिक - ४२२००७.

  • ई-मेलद्वारे अर्ज: उमेदवार आपले अर्ज आणि संबंधित कागदपत्रे hrd@namcobank.in या ई-मेल आयडीवर देखील पाठवू शकतात.

  • माध्यम: अर्ज पोस्टाने, कुरियरने, प्रत्यक्ष बँकेत जाऊन किंवा ई-मेलद्वारे सादर करता येतील.

अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेच्या www.namcobank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा ०२५३-२३०८२०० ते २०६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

SCROLL FOR NEXT