अहिल्यानगर : रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. नागेबाबा मल्टिस्टेटने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बँकिंग आणि सहकार क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
या भरतीअंतर्गत मार्केटिंग/मीडिया ऑफिसर, आयटी ऑफिसर, ऑफिस ॲडमिन, सुरक्षा रक्षक आणि टेलिकॉलर अशी विविध पदे उपलब्ध आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट निश्चित करण्यात आली आहे.
मार्केटिंग/मीडिया ऑफिसर पदासाठी पदवीधर उमेदवारांसोबत मार्केटिंग किंवा मीडिया क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. आयटी ऑफिसर पदासाठी BCA, MCA किंवा पदवीधरांसह संगणकाचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. ऑफिस ॲडमिन पदासाठी पदवीधर आणि संगणक ज्ञान असलेले उमेदवार पात्र ठरणार असून, बँकिंग क्षेत्रातील अनुभवाला प्राधान्य दिले जाणार आहे.
सुरक्षा रक्षक पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर टेलिकॉलर पदासाठीही १२ वी शिक्षणासोबत संगणक ज्ञान आणि संवाद कौशल्य अपेक्षित आहे.
इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येण्यापूर्वी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती तपासावी. तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नागेबाबा मल्टिस्टेटच्या कॉर्पोरेट ऑफिस, नागेबाबा टॉवर, माळीवाडा बसस्टँडसमोर, सावेडी, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा. तसेच ९५५२५५४०१० या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.
ही भरती प्रक्रिया स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारी ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.