बँकेचे संस्थापक जे. के.(बापू) जाधव,सुधीर जाधव, दौलत लोखंडे, निर्मला जाधव, उमेश लाड व उपस्थित मान्यवर  
Co-op Banks

मानसिंग बँकेचा १० टक्के लाभांश; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव

सभासदांच्या विश्वासाला बँकेकडून लाभांशाची भेट; गुणवंतांचा उत्साहात सन्मान

Vijay chavan

मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधीर जाधव होते. त्यांनी सभासदांसमोर बँकेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून वर्षभरातील बँकेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

या सभेमध्ये बँकेच्या सर्व सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना आर्थिक वर्षातील विविध कामगिरीची माहितीही सभासदांना देण्यात आली.

सभेमध्ये गुणवंत व्यक्तींचा गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचाही सत्कार करण्यात आला. तसेच सभेमध्ये गिरीश मोहिते यांनी सी.ए. परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल आणि किर्लोस्करवाडी येथील हर्षवर्धन कुलकर्णी यांची फुटबॉल खेळामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव नलवडे , शरद शिंदे , सूर्यकांत बुचडे , वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे, डॉ. ए. माने, किरण चव्हाण, प्रमोद जाधव, अॅड. भारत मोहिते, अजित शिरगावकर , निवास पाटील, प्रदीप पाटील, शिवदास जांभळे, शंकर कदम, शिवाजी भार्गव , श्रीकांत निकम , संतोष बिडकर, पांडुरंग पाटील, पुरुषोत्तम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सभेतील वार्षिक अहवालाचे वाचन हनुमंत महाडिक यांनी केले. सूत्रसंचालन हनीफ मुजावर यांनी केले, तर अजित सूर्यवंशी यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT