महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या.,लातूर  
Co-op Banks

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या.,लातूर मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

IT अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि अंतर्गत लेखापरीक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले; अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

Vijay chavan

लातूर येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या. यांनी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बँकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार IT अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि अंतर्गत लेखापरीक्षक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

IT अधिकारी पदासाठी अभियांत्रिकी किंवा संगणक शाखेतील पदवी/पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून संबंधित क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे. तसेच CBS प्रणाली व बँकिंग सॉफ्टवेअरचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

शाखा व्यवस्थापक पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी/पदव्युत्तर शिक्षणासोबत बँकिंग क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे. GDC&A किंवा तत्सम पात्रता असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

अंतर्गत लेखापरीक्षक पदासाठी B.Com/M.Com तसेच CAIIB किंवा MBA Finance सारखी पात्रता आवश्यक असून ऑडिट, रिस्क मॅनेजमेंट, कंप्लायन्स यांचा किमान ५ वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 19 एप्रिल २०२६ पर्यंत बँकेच्या अधिकृत ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्यासाठी अधिकृत ई-मेल आयडी:

maharashtranagaribank@gmail.com

अर्ज पाठवताना शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेशी थेट संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT