महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणारी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई या शिखर संस्थेस मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक करावयाची आहे. तरी खालीलप्रमाणे पात्रता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत amscba@mscba.info या ई-मेल आयडीवर किंवा वरील पत्त्यावर पाठवावेत.
पात्रता व अनुभव:
अ) पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर (एम.कॉम., एम.ए. अर्थशास्त्र यांना प्राधान्य).
ब) नेमणुकीच्या वेळी व्यक्तीचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी व ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
क) उमेदवारास बँकिंग क्षेत्रामधील वरिष्ठ पातळीवर अधिकारी म्हणून काम केल्याचा कमीत कमी १५ वर्षांचा अनुभव असावा. (सहकारी बँकेत काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.)
ड) सुयोग्य उमेदवाराच्या बाबतीत अनुभव, वय इत्यादी अटी शिथिल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
इ) नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहील. याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही.
सही/-
सी.ए. भाऊ भगवंत कड
अध्यक्ष
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई १९/२१, शिल्पिन सेंटर, ४०, जी. डी. आंबेकर रोड, वडाळा, मुंबई - ४०००३१. वेबसाईट : https://mscba.info