लातूर : लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लातूर यांनी पुणे कार्यालयासाठी अनुभवी रिकव्हरी अधिकाऱ्यांची (Recovery Officers) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या वाढत्या थकबाकी वसुली (NPA Recovery) कामकाजासाठी सक्षम, अनुभवी आणि कायदेशीर ज्ञान असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
या पदासाठी निवड होणाऱ्या अधिकाऱ्यांना एनपीए आणि ओव्हरड्यू खात्यांची वसुली, कर्जदारांशी नियमित पाठपुरावा, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम (MCS Act) आणि SARFAESI कायद्यानुसार कायदेशीर कारवाई हाताळण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. याशिवाय, वकिलांशी समन्वय साधणे आणि कायदेशीर प्रक्रियांचे प्रभावी व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.
या पदासाठी उमेदवाराकडे बँक, नागरी सहकारी बँक (UCB) किंवा NBFC क्षेत्रातील किमान ५ ते १० वर्षांचा रिकव्हरी अनुभव असणे आवश्यक आहे. विशेषतः कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
निवड होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या अनुभव आणि कौशल्यानुसार आकर्षक वेतन पॅकेज दिले जाणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
या संधीमध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा :
📞 9623454919
📞 9552521945
बँकिंग व रिकव्हरी क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांसाठी ही एक महत्त्वाची करिअर संधी असून, इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.