कुर्मांचल नगर सहकारी बँक 
Co-op Banks

कुर्मांचल सहकारी बँकेचे नवीन वास्तूत भव्य उद्घाटन

याप्रसंगी ग्राहक सभेचेही आयोजन

Pratap Patil

उत्तराखंड येथील खातिमा कंजबाग क्रॉसिंग येथील कुर्मांचल नगर सहकारी बँक नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर, नव्या वास्तूचे  उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ग्राहक सभेचेही आयोजन करण्यात आले होते.

कुर्मांचल नगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश जैन, संचालक मंडळाचे सदस्य गिरीश पाठक आणि सचिव संजय शाह यांनी रिबन कापून नव्या वास्तूत बँकेचे उद्घाटन केले. ग्राहकांच्या बैठकीत बँकेच्या ग्राहकांनी आपले विचार आणि सूचना मांडल्या. बँकेचे सचिव संजय शाह यांनी ग्राहकांना बँकेच्या आगामी योजनांची माहिती दिली आणि त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ग्राहकांच्या सूचना बँकेकडून अंमलात आणल्या जातील, असे आश्वासन दिले. प्रादेशिक व्यवस्थापक हरीश शाह, मानव संसाधन प्रमुख दिनेश जोशी, शाखा व्यवस्थापक नरेंद्र सिंग बिष्ट, अनुज सिंग शाही, रमेशचंद्र अग्रवाल, होशियार सिंग वलदिया, अर्शदीप सिंग, श्रीराम अरोरा, अन्सार हुसेन, जगदीश गुप्ता इत्यादी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT