कोल्हापूर:
पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रात साडेचार दशके उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेचा ठसा उमठवणाऱ्या दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर या नामवंत बँकेत आता उच्च पदांवर नव्या नेतृत्वासाठी संधी उपलब्ध झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार, शाखा विस्तार, तसेच सुमारे ₹1300 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या या बँकेने, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि महाव्यवस्थापक (GM) ही अत्यंत महत्त्वाची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
कोल्हापूर, कराड आणि पुणे येथील शाखांसह संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या या बँकेने व्यवस्थापनात गुणवत्ता, अनुभव आणि दूरदृष्टी असलेल्या सक्षम नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे.
बँकेबाबत थोडक्यात माहिती:
मुख्य कार्यालय: गंगावेश, कोल्हापूर
शाखा: कोल्हापूर, कराड, पुणे
कार्यक्षेत्र: संपूर्ण महाराष्ट्र
एकूण व्यवसाय: ₹1300 कोटींपेक्षा अधिक
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)
महाव्यवस्थापक (General Manager)
शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे: www.kopurbanbank.com
इच्छुक व पात्र उमेदवारांनी पगाराच्या अपेक्षेसह आपला अर्ज खालील ई-मेलवर पाठवावा: hr@kopurbanbank.com
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख: १५ ऑगस्ट २०२५
📱 मोबाईल: 7720077512 / 9021072800
सूचना: नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय मा. संचालक मंडळाकडे राखीव आहे. या निर्णयासंबंधी कोणतीही तक्रार स्वीकारण्यात येणार नाही.